Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result Updates : महायुतीला जबर धक्का, सतीश चव्हाण पिछाडीवर, संभाजीनगरात टेन्शन वाढवणारे आकडे समोर, निकाल नेमका काय?

सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर आहेत आणि सतीश चव्हाण हे पिछाडीवर आहेत. असाच कल कायम राहिला तर सतीश चव्हाण यांना जबर धक्का बसू शकतो.

Chhatrapati Sambhajinagar MLC Election Result Updates : महायुतीला जबर धक्का, सतीश चव्हाण पिछाडीवर, संभाजीनगरात टेन्शन वाढवणारे आकडे समोर, निकाल नेमका काय?
chhatrapati sambhaji nagar mlc election result today
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 6:04 PM

Chhatrapati Sambhajinagar MLC Graduate Election Result Today : राज्यात विधानपरिषदेच्या एकूण पाच जागांवर निवडणूक झाली. या पाचही जागांवरील मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. या पाच जागांपैकी छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष आहे. या जागेवर कोण बाजी मारणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. महायुतीचे सतीश चव्हाण आणि शरद पवार यांच्या पक्षाचे प्रतापसिंह पाटील यांच्यात कांटे की टक्कर होत आहे. असे असतानाच आता महायुतीला जबर धक्का देणारी आकडेवारी समोर आली आहे. प्रतापसिंह पाटील आता आघाडीवर आहेत.

नेमकी काय माहिती समोर आली?

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली. अगोदर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. या मतांच्या मोजणीत प्रतापसिंह पाटील आणि सतीश चव्हाण यांच्यात मतांचा फरक नव्हता. आता प्रत्यक्ष मतांची मोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंत 35000 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या मतमोजणीनंतर प्रतापसिंह पाटील 4000 मतांनी पुढे आहेत. अधिकृत आकडेवारीची प्रतीक्षा आहे. 70 टेबलवर मतमोजणी होत आहे. पुढच्या दोन ते अडीच तासांत ही मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या जागेवरून कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे.

Loading...

दिलीप घुले नेमका काय गेम करणार?

सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर आहेत आणि सतीश चव्हाण हे पिछाडीवर आहेत. असाच कल कायम राहिला तर सतीश चव्हाण यांना जबर धक्का बसू शकतो. दुसरीकडे याच जागेवर ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिलीप घुगे हेदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांना जास्त मतं मिळाली तर प्रतापसिंह पाटील यांना मात्र हे अडचणीचं ठरू शकतं. याच मतदारसंघातून सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर रविराज साबळे हेदेखील काही मतं घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा स्थितीत सध्यातरी चव्हाण पिछाडीवर असल्याने महाविकास आघाडीच्या गोटात हर्षोल्हासाचे वातावरण आहे. मतमोजणीच्या पुढच्या फेऱ्यांत नेमकं काय होणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us