खवड्या डोंगराहून उडी मारणाऱ्या कुणालच्या आईचा धक्कादायक व्हिडीओ पुढे, आयफोन नाहीच..
कुणाल चांदगुडे याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. सुरूवातीला सांगण्यात आले की, आयफोन हवा होता म्हणून कुणालने डोंगराहून उडी घेतली. मात्र, यादरम्यान त्याच्या आईचा एक गंभीर आरोप करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील देवळाली परिसरात दुर्देवी घटना घडली. खवड्या डोंगराहून मुलगा, आई वडिलांचा पडून मृत्यू झाला. मुलगा डोंगरावर पोहोचला. याबाबत माहिती मिळताच आई आणि वडिलांनी थेट डोंगराकडून धाव घेतली. आईने लेकाची समजूत काढली. तिने मंगळसूत्रही काढून फेकले. मात्र, 19 वर्षीय मुलगा कोणाचेही काहीही ऐकण्यात तयार नव्हता. उपस्थित लोकही त्याला समजून सांगत होते. पण तो ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी वडिलांनी त्याला पकडले. मात्र, यादरम्यान वडील आणि मुलगा डोंगराहून खाली कोसळले. हे पाहून आईने देखील उडी मारली. तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, मुलाला आयफोन पाहिजे होता, ज्यामुळेच तो डोंगरावर पोहोचला होता. मात्र, आता अनेक धक्कादायक गोष्टी पुढे येत आहेत. कुटुंबात काहीतरी वाद असल्याचे सांगितले जातंय.
कुणाल चांदगुडे वय 19 असे खवड्या डोंगराहून उडी घेणाऱ्या मुलाचे नाव आहे. त्याच्यासोबतच मुरलीधर चांदगुडे वडील आणि आई संगीता चांदगुडे यांंनीही लेकासोबत डोंगराहून उडी घेतली. आता याबाबत मोठे खुलासे होत आहे. त्यातच कुणालच्या आईचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुणालची आई काही गंभीर आरोप करताना दिसत आहे.
एका व्हिडीओमध्ये कुणालची आई संगीता म्हणतात की, माझ्या मुलाचे खाऊन म्हातारपणाला तू बदाम खाणार नाहीस… मेडिसिनच खाशील… जेव्हा खाशील ना, तेव्हा तुला रडायलाही माणूस भेटणार नाहीत. कुणालची आई हे सर्व तळतळाटाने बोलताना दिसतंय. कर्म येतील नक्कीच तुझ्याकडं, लवकरच येतील. माझा हा शब्द आहे, एका आईचा शब्दय असं त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.
यासोबतच दुसऱ्या एका व्हिडीओत संगीता या म्हणताना दिसल्या की, जी बायको तुमच्या वाईट काळात तुमच्यासोबत होती. तुमच्या आजारपणात दवाखान्यात चकरा मारत होती. ती बायको आता वाईट आणि तुमच्या बहिणी तुमच्या मयतीलाही येणार नाही. कदाचित यालाच रक्त म्हणतात… संगीत यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की, त्यांच्या कुटुंबात मोठा वाद होता.