
मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीनं बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय सरोगसी आणि एग डोनेशनचा पर्दाफाश केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक देखील केली आहे. याप्रकरणी बँकॉक येथून मायदेशी परतलेल्या महिलांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. पण रॅकटची मास्टरमाइंड समजली जाणारी तिसरी महिला अद्याप फरार आहे. तपासात असं दिसून आलं आहे की, ही टोळी भारतातून महिलांना बँकॉकला घेऊन जात असे, जिथे एग डोनेशन आणि सरोगसी प्रक्रिया बेकायदेशीरपणे पार पाडल्या जात होत्या. या रॅकेटचा मुख्य उद्देश एग डोनेशन आणि सरोगेट मातांना आयव्हीएफ केंद्रांमध्ये पोहोचवणे हा होता.
सुनोती बेलेल (44)
आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले
उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश
नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार
भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
सीमा विंझारत (29)
या रॅकेटमधील आणखी एक प्रमुख सदस्य संगीता बागुलचा शोध अद्याप सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकरणाचं गांभीर्य आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे, पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या टोळीची कार्यपद्धती अत्यंत धक्कादायक होती. भारतात सरोगेसीचे कायदे अत्यंत कठोर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टोळी गरीब आणि अविवाहित महिलांना आमिष देत निवडलं जात होतं. नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून, तो अविवाहित महिलांसाठी बनावट कागदपत्रे तयार करत असे, ज्यामुळे त्यांना कागदावर महिला विवाहित दाखवत असे.
पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन, पासपोर्ट, बोर्डिंग पास, मेडिकल रिपोर्ट्स आणि अन्य डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध सरोगसी (नियमन) कायदा, 2021 आणि भारतीय दंड संहिता, 2023 च्या विविध कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे. या आंतरराष्ट्रीय नेटवर्कशी संबंधित इतर लोकांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी केली जात आहे.