
संपूर्ण देशाचे आराध्यदैवत असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त कुशल योद्धा नव्हे तर दूरदृष्टी असलेले, रयतेचे राजे, अष्टावधानी, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा होते. महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशात, त्यांचं नाव गाजतं, इतिहासात त्यांच्या नावाची, कार्याची आणि त्यांच्या शौर्याची सुवर्णाक्षरांनी नोंद केलेली आहे. फक्त मराठी जनच नव्हे तर सर्वच लोक त्यांना मानतात, त्यांच्या विचारांचे पूजन केले जाते आणि ते रोजच्या आयुष्यात अमलात आणण्यासाठी सदोदित प्रयत्न केले जातात.
आजचा दिवस हा नव्या पिढीला इतिहासाची ओळख करून देण्याचा आणि आपल्या परंपरेचा अभिमान बाळगण्याचा आहे. शिवरायांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी काही खास मेसेज, संदेश आज घेऊन आलो आहोत. हे संदेश तुम्ही स्टेटस म्हणून ठेवू शकता किंवा प्रियजनांनाही ते पाठवू शकता. या शिवजयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकत्र येत त्यांच्या विचारांना उजाळा देऊया आणि स्वराज्याची मूल्य आपल्या आयुष्यात जपूया..
शिवजयंतीनिमित्त काही संदेश
1)
विजेसारखी तलवार चालवून गेला
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक “मर्द मराठा शिवबा”होऊन गेला.
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा |
2)
निधड्या छातीचा, दणकट कणांचा,
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा…
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
3)
स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवणाऱ्या त्या शूर योद्ध्याला शतशः प्रणाम! शिवरायांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
4)
ज्यांनी कधीही भीती बाळगली नाही, ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या रक्षणासाठी तलवार हाती घेतली त्या शूर शिवाजी महाराजांना शतशः प्रणाम!
5)
पुन्हा सर्वदूर पसरवू महाराष्ट्राची कीर्ती,
शिवरायांची स्मरून मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती!
एकच ध्यास – जपू महाराष्ट्राची संस्कृती!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
6)
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना छत्रपती म्हणतात
जय जिजाऊ जय शिवराय
तमाम शिवभक्तांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
7)
श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत
श्री राजा शिवछञपती यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा🚩
शिवजयंतीच्या सर्व शिवभक्त मित्रांना शिव-शुभेच्छा
8)
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
जय जिजाऊ, जय शिवराय!
9)
सागराचे पाणी कधी आटणार नाही…
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
हा जन्म काय,
हजार जन्म झाले तरी…..
नाद “शिवरायांचा” सुटणार नाही..
!! जय भवानी जय शिवाजी !!
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा |
10)
स्वराज्याचे बांधून तोरण,
शत्रूंना आणले शरण,
देशाला आहे त्यांचा अभिमान,
छत्रपती शिवरायांचे गाऊया गुणगान!