या शहरात शिवाजी महाराज विराजमान झाले, वाद संपला आणि भाजपा-मविआ कार्यकर्ते आनंदाने एकत्र आले…

| Updated on: Jan 04, 2023 | 11:12 PM

पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये झटापटीचा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी 30 आंदोलकांना ताब्यात घेतले.

या शहरात शिवाजी महाराज विराजमान झाले, वाद संपला आणि भाजपा-मविआ कार्यकर्ते आनंदाने एकत्र आले...
Follow us on

सांगली : आष्टा शहरामध्ये गेल्या 9 दिवसांत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोनदा उभारण्यात आला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास शिवप्रेमींनी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फुटी अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने पुतळा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात केला. पुतळ्याला परवानगी आणि जिल्हा प्रशासनाने पुतळ्यासाठी आष्टा नगरपालिकेकडे जागा हस्तांतरण करण्यासाठी शिवप्रेमी आक्रमक झाले. या मागणीसाठी मंगळवारी सायंकाळी 7 वाजता पुतळ्यासमोर महाआरती करण्याचे जाहीर करण्यात आले होते.

महाआरती करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळं इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष नाशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींनी ठिया आंदोलन केले.

प्रशासनाकडून पुतळ्याला परवानगी आणि जागा हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती निशिकांत पाटील यांनी दिली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. जागा हस्तांतरण केल्याशिवाय पुतळा हलवू नये,अशी भूमिका शिवप्रेमींनी जाहीर केली.

प्रशासनाकडून पुतळा हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. आष्टा शहरातील सांगली- इस्लामपूर रस्त्यावर शिवप्रेमींनी रास्ता रोका केला. यावेळी पोलीस आणि शिवप्रेमींमध्ये झटापटीचा प्रकार घडला.

त्यानंतर पोलिसांनी 30 आंदोलकांना ताब्यात घेतले. प्रशासनाने पुतळा परिसरातील वीज पुरवठा खंडित करून मंगळवारी रात्रीच्या सुमारास पुतळा हटवण्याचे काम सुरू केले. पोलीस बंदोबस्तात मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर हटवण्यात आला.

आता या सर्व प्रकरणावर अखेर पडदा पडला आहे. जिल्हा प्रशासनाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी परवानगी आणि जागा हस्तांतरणाचा निर्णय घेण्यात आलाय.

आष्टा नगरपालिकेकडे छत्रपती शिवाजी चौक येथील जागा हस्तांतरण करण्यात आली. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेचा चिघळलेला प्रश्न अखेर सुटला आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांनी आष्ट्यामध्ये जल्लोष साजरा केलाय.