तुम्ही आरसा बघा… देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर जोरदार टीका, अमित शाहांसमोर म्हणाले..

Devendra Fadnavis big statement : आहिल्यानगरमधून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यादरम्यान त्यांनी विरोधकांना थेट आरसा बघण्याचा सल्ला दिला. यावेळी आमित शाहा देखील उपस्थित होते.

तुम्ही आरसा बघा... देवेंद्र फडणवीस यांची विरोधकांवर जोरदार टीका, अमित शाहांसमोर म्हणाले..
CM Devendra Fadnavis
| Edited By: | Updated on: Oct 05, 2025 | 3:10 PM

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे आज आहिल्यानगर दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी गुरूस्थानचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. आहिल्यानगरच्या लोणीतील कार्यक्रमातून बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, शाहांनी नव्याने सहकार रूजवण्याचे काम केले आहे. बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्याला दुष्काळातून काढण्यासाठी मोठं काम केले आहे.

बाळासाहेब विखे यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी

देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटले की, बाळासाहेब विखे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही ती जबाबदार राधाकृष्ण विखे पाटील यांनाच दिली. त्यांची चाैथी पिढी देखील येथे आहे. नगर, मराठवाड्यातील दुष्काळ लवकरच संपेल असा मला विश्वास आहे. राज्यातील दुष्काळ दूर करण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराची चळवळ सुरू केली.

देवेंद्र फडणवीस यांनी केली विरोधकांवर जोरदार टीका 

मोदी पहिले पंतप्रधान ज्यांनी सहकाराचं महत्व समजून घेतल. आज पुतळ्याचे उद्धाटन नव्हे तर पद्स्मरण आहे. देश पातळीवर सहकार मंत्रालय उभारण्याचे काम केले. सहकारवर मत्तेदारी समजणाऱ्याच्या तोंडात आता बोट आहे. बाळासाहेब विखे पाटलांनी महाराष्ट्राला जागरूक केलं. यावेळी काही कारखानदारांना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा इशारा दिला आहे. हेच नाही तर आहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसाबद्दल बोलताना ते दिसले.

तुम्ही आरसा बघा…देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सल्ला 

फडणवीस यांनी पुढे म्हटले की, आहिल्यानगरमध्ये कधीही न बघितलेला पाऊस झाला. आम्ही शेतकऱ्यांची मदत करतोय. अमित शाह यांनी आम्हाला सांगितले की, काळजी करू नका, शेतकऱ्यांना मदत करू. मी काही लोकांना सांगतो की, तुम्ही आरसा बघा. तुम्ही शेतकऱ्यांना किती मदत केली हे पाहा. शेतकऱ्यांचे पैसे घेत आहेत, असे पसरवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.