Chiplun Flood : खेड आणि चिपळूणचा संपर्क तुटलेलाच, नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु – विजय वडेट्टीवार

| Updated on: Jul 22, 2021 | 3:06 PM

300 मिलिमीटर पाऊस म्हणजे सर्व यंत्रणा कोलमडण्यासारखं आहे. आज सकाळी एनडीआरएफच्या दोन टीम पोहोचल्या आहेत. कोस्ट गार्डच्या टीमही पोहोचल्या आहेत. मदतकार्याला सुरुवात झाली आहे. लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. एअरलिफ्ट करण्यासाठीही मदत मागितली आहे.

Chiplun Flood : खेड आणि चिपळूणचा संपर्क तुटलेलाच, नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी प्रयत्न सुरु - विजय वडेट्टीवार
महापूर,विजय वडेट्टीवार
Follow us on

मुंबई : चिपळूमध्ये पावसानं हाहा:कार माजवला आहे. त्यामुळे चिपळूणमध्ये सध्या ढगफुटीसदृश्य स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील 48 तासांत खेड आणि चिपळूणमध्ये तब्बल 300 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. कोयना धरणाच्या खालच्या धरणाचं पाणी सोडावं लागलं. जर असं केलं नसतं तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. कालपासून रेड अलर्ट दिला होता पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होईल याचा अंदाड नव्हता, अशं वडेट्टीवार म्हणाले. (Khed and Chiplun both routes closed, government prepares to airlift citizens)

300 मिलिमीटर पाऊस म्हणजे सर्व यंत्रणा कोलमडण्यासारखं आहे. आज सकाळी एनडीआरएफच्या दोन टीम पोहोचल्या आहेत. कोस्ट गार्डच्या टीमही पोहोचल्या आहेत. मदतकार्याला सुरुवात झाली आहे. लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. एअरलिफ्ट करण्यासाठीही मदत मागितली आहे. खेड आणि चिपळूणचे दोन्ही रस्ते बंद झाल्यामुळे संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत एकाही मृत्यूची माहिती नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले. निसर्गापुढे मर्यादा असतात. मदत पोहोचवण्यातही मर्यादा येत आहेत. पण आम्ही मदत पोहोचवत असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

परब, सावंत निवळीमध्येच अडकले

चिपळूणमध्ये सध्या 7 बोटीद्वारे बचावकार्य सुरु असल्याची माहिती परब यांनी दिली. एकूण किती लोक अडकून पडले आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही मात्र, आतापर्यंत 75 नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आलं आहे. गरज भासल्यास लोकांना एअरलिफ्ट करण्याची तयारीही राज्य सरकारनं केल्याचं परब म्हणाले. रत्नागिरीमधून बैठक आटोपून अनिल परब आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरीकडे रवाना झाले आहेत. मात्र, चिपळूणमध्ये जाण्यास कुठलाही मार्ग नसल्यामुळे परब आणि सामंत हे निवळीमध्ये अडकले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मते 2005 पेक्षाही भयावह स्थिती निर्माण झाल्याचं उदय सामंत म्हणाले.

विनायक राऊत कोकणाकडे रवाना

कोकणात पावसाने हाहाकार उडवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहराचा बहुसंख्या भाग पाण्याखाली गेला आहे. रस्ते, बाजारपेठा पूर्णत: पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. घरंच्या घरं बुडाली आहेत. चिपळूण शहराला पाण्याचा वेढा पडला आहे. अशा भीषण स्थितीमुळे शिवसेना खासदार विनायक राऊत दिल्लीवरुन कोकणाकडे रवाना होत आहेत. खासदार विनायक राऊत हे संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत.

संबंधित बातम्या :

Chiplun Flood: चिपळूण जलमय, ढगफुटीने हाहाकार; बाजारपेठेत 5 फुट पाणी, अनेक जण पुरात अडकले, 2005च्या पुनरावृत्तीची भीती

Chiplun Flood : चिपळूणमध्ये पावसाचा हाहा:कार; 7 बोटींद्वारे बचावकार्य सुरु, आतापर्यंत 75 लोक सुरक्षितस्थळी- अनिल परब

Khed and Chiplun both routes closed, government prepares to airlift citizens