AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हेच स्वप्न होतं का? अभिजीत दिपके अॅक्शन मोडमध्ये; संविधान रॅलीनंतरचा सीजेपीचा प्लान उघड

अभिजीत दिपके नागपुरात पोहोचले आहेत. नागपुरात सीजीपीने संविधान दिनाच्या रॅलीचे आयोजन केलं आहे. या रॅलीआधी संवाद साधताना दिपकेंनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांचे हेच स्वप्न होतं का? अभिजीत दिपके अॅक्शन मोडमध्ये; संविधान रॅलीनंतरचा सीजेपीचा प्लान उघड
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 8:29 AM
Share

कॉक्रोच जनता पार्टीने नागपुरात संविधान दिनानिमित्त रॅलीचं आयोजन केलं आहे. नागपूरच्या संविधान दिनानिमित्त देशभरातील तरुण नागपूरच्या रॅलीत हजेरी लावण्याची शक्यता आहे. रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. या रॅलीच्या आधी अभिजीत दिपके यांनी सीजेपीची भूमिका मांडली. अभिजीत दिपकेंनी संवाद साधताना दुष्काळावरून फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अपुरी मदत मिळत असल्याचा आरोप दिपकेंनी केला.

अभिजीत दिपके म्हणाले, ‘अतिशय वाईट परिस्थिती आहे. 1972 सालानंतर इतका भीषण दुष्काळ राज्यात पडला आहे. कुठे ना कुठे…सरकारचा असंवेदनशीलपणा सरकारचा दिसत आहे. दुष्काळाच्या मुख्यमंत्री कुठे आहेत, तर एका इव्हेंटमध्ये आहेत. शेतकरी त्रासलेला आहे. शेतकरी टोकाचा निर्णय घेताहेत. परंतु आकडेवारी बाहेर येत नाही. काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी आयुष्य संपवलेल्या प्रकरणाचे आकडे जाहीर करत नाही. आकडे लपवून समस्या सुटणार नाही. जमिनीवर उतरावा लागेल. गोकुळमध्ये जे घडलं. त्यासाठी 80 लाख देताहेत. तर शेतकऱ्यांना काय देताहेत. पीडितांना किती देताहेत आणि शेतकऱ्यांना किती देताहेत, याची तुलना करा. हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं का?’.

कॉक्रोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन मागे घेतलं का, असा प्रश्न विचारल्यावर दिपके म्हणाले, आम्ही ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठं आंदोलन केलं. या आंदोलानंतर त्यांनी घेतलेले सहा निर्णय घेतले. त्यांनी मनमानी पद्धतीने निर्णय घेतले होते. आम्ही केलेल्या आंदोलनाचा फरक पडला आहे. हे यशच आहे. त्यांनी 6 निर्णय मागे घेतले, तर यशच हे. ज्ञानेश कुमारांचा निर्णय योग्य असेल, तर त्यांनी निर्णय मागे का घेतले?’.  संविधानी दिनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना संदेश देताना त्यांनी म्हटलं की, ‘ कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते 35 दिवस जंतरमंतरवर बसले होते. त्यांच्या बळावरच आंदोलन यशस्वी झालं होतं. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला होता. जिथे जिथे संविधान बचाव रॅलीत सहभागी होतील’.

पुढचा दौरा ठरला 

‘आम्ही शेतकऱ्यांसाठीही दौरा करणार आहे. दुष्काळची पाहणी करणार आहे. 1972 नंतरचा भीषण दुष्काळ आहे.  संविधानाची रक्षा करणं गरजेचं, यासाठी पुढे येणं गरजेचं आहे.   बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा आहे. कोणी राष्ट्रभक्त असल्याचं प्रमाणपत्र मागते, तर कुणी दलित असण्याचं प्रमाणपत्र मागते. मी कशाचं प्रमाणपत्र देऊ. क्या बोलती पब्लिक हे आम्ही राजस्थानमध्ये देखील जाणार आहोत’, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा
Abhijeet Dipke : गोकुळमधील केस लढायला 90 लाख दिले, शेतकऱ्यांना किती पैसे दिले? दीपकेंचा सवाल
पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरण पुन्हा चर्चेत, 2 डिसेंबरपूर्वी तपासाची सद्यस्थिती स्पष्ट करा; हायकोर्टाचे आदेश
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा निर्णय काय? VIDEO बघाच
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात
माटुंग्यात ज्वेलर्सवर अंदाधुंद गोळीबार! 5 ते 6 राऊंड फायरिंगने परिसरात खळबळ
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर