CJP Protest Mumbai LIVE : आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

CJP Protest at Shivaji Park, Mumbai LIVE Coverage Updates in Mumbai : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अभिजीत दिपके मैदानात उतरले आहे. आज दादर येथील आंदोलनापूर्वीच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

CJP Protest Mumbai LIVE : आंदोलनापूर्वीच अभिजीत दिपकेंना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात
टीव्ही 9 मराठी लाईव्ह ब्लॉग
| Updated on: Oct 02, 2026 | 9:23 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 02 Oct 2026 09:25 AM (IST)

    राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज दुष्काळी दौरा करणार

    राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज दुष्काळी दौरा करणार आहेत….पुण्यातील मोदी बाग निवासस्थानातून शरद पवार बाहेर पडतील आणि मग पाहणीला सुरुवात करतील…

  • 02 Oct 2026 09:20 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवेआगार येथील दुर्घटनेवर शोक व्यक्त

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवेआगार येथील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे, ते म्हणाले की, “रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगार येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अ‍ॅकडमी, आळंदीच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आणि पीडादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. हे सर्व विद्यार्थी आळंदी येथील असून, त्यांचे पार्थिव आळंदी येथे नेण्यासाठी स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत.”


  • 02 Oct 2026 09:15 AM (IST)

    महात्मा गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन..

    महात्मा गांधी जयंतीनिमित्त जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रेचे आयोजन..अहिंसा सद्भावना यात्रेतून सत्य, अहिंसा, शांतता आणि एकतेचा संदेश. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आयोजित यात्रेमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सहभाग. खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची उपस्थिती. लालबहादूर शास्त्री चौकातून यात्रेला प्रारंभ होऊन नवीन बसस्थानकमार्गे महात्मा गांधी उद्यानात समारोप. यात्रेत महात्मा गांधी यांच्या विचारांच्या वेगवेगळी फलक हातात घेत अनुभूती शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने घेतला सहभाग.‘भारत माता की जय’, ‘महात्मा गांधी की जय’च्या घोषणां देत विविध वेशभूषांमधून विद्यार्थ्यांनी घडवले भारताच्या विविधतेचे दर्शन. यात्रेत चरख्यावर सूत कातण्याचे प्रात्यक्षिक दाखवत महात्मा गांधीजींच्या स्वदेशी वस्तूच्या विचारांना उजाळा

  • 02 Oct 2026 09:10 AM (IST)

    धाराशिव चोरीप्रकरणी तपासाला वेग

    धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कंडारी येथील थोरल्या श्री काळभैरवनाथ-जोगेश्वरी मंदिरात झालेल्या चोरीप्रकरणी तपासाला वेग आला आहे. मंदिरातून देवीचे सोन्या-चांदीचे दागिने, मुखवटा आणि दानपेटी असा अंदाजे ५ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. घटनेनंतर फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळावरील नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, चोरीच्या कालावधीत मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास केला जात असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.

  • 02 Oct 2026 09:05 AM (IST)

    समृद्धी महामार्ग अपघात प्रकरण

    समृद्धी महामार्ग अपघात प्रकरण. एका जखमीला नागपूरला पाठवणार. सावंगी येथे जखमी रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु. जखमी रुग्णांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक. सकाळी साडे तीन वाजतापासून रुग्णालयात झाली होती जखमी यायला सुरवात. घटनेने वर्धेत हळहळ. घटनेत एकूण सात लोकांचा मृत्यू. 21 रुग्णांवर सावंगी येथे उपचार. एकास नागपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात येणार

     


  • 02 Oct 2026 09:00 AM (IST)

    तुळजापुरात नवरात्रोत्सवाची लगबग; छबिना वाहनांची सजावट सुरू

    तुळजाभवानी मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवसांत दररोज निघणाऱ्या छबिना मिरवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध प्राण्यांच्या मूर्ती म्हणजेच तुळजाभवानीचे वाहनांना रंगरंगोटी करण्यात येत आहे. गरुड, हत्ती, बदक, वाघ, सिंह यांसह विविध पशू-पक्ष्यांच्या मूर्ती आकर्षक रंगांनी सजवण्यात येत आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान या वाहनांवरून देवीचा छबिना काढण्यात येतो. त्यामुळे या मूर्तींना नवा साज चढवण्याचे काम सुरू असून, नवरात्रोत्सवासाठी मंदिर परिसरात धार्मिक तयारीला वेग आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  • 02 Oct 2026 08:50 AM (IST)

    महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जालना जिल्हा दौऱ्यावर

    राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.भोकरदन तालुक्यातील दगडवाडी गावात ते दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करणार आहेत.जालना जिल्ह्यात मागील दीड महिण्यापासून पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत खरीप पिकांवर संकट ओढावलं आहे.सोयाबीन,कापूस आणि इतर पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसला असल्याने पिकं करपून गेली आहे.या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बावनकुळे आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधवार जाऊन पिकांची पाहणी करणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

  • 02 Oct 2026 08:40 AM (IST)

    सिंदफणा कोरडीठाक, कोरड्या दुष्काळाचे भीषण दृश्य

    गेल्या वर्षी महापुराचा वेढा पडलेल्या सिंदफणा नदीकाठच्या नांदूर हवेली व हिंगणी हवेली गावांमध्ये यंदा भीषण कोरडा दुष्काळ पडला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने पिके आणि जमिनी खरडून नेल्या होत्या, तर यंदा पावसाअभावी उभी पिके जळून खाक झाली आहेत. गेल्या वर्षीच्या महापुरानंतर शासन-प्रशासनाने पाहणी करूनही शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप म्हणावी अशी मदत पडलेली नाही. ओल्या दुष्काळानंतर आता कोरड्या दुष्काळाच्या दुहेरी संकटात सापडलेल्या या हवालदिल शेतकऱ्यांचे अश्रू सरकार पुसणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

  • 02 Oct 2026 08:30 AM (IST)

    भ्रष्टाचारात मदत करणाऱ्या खासगी व्यक्तीवरही कारवाई-उच्च न्यायालय

    सरकारी कर्मचारी नसला तरी सरकारी कर्मचाऱ्याला भ्रष्टाचारात मदत करणाऱ्या खासगी व्यक्तीवरही कारवाई करता येणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. खासगी व्यक्ती आरोपी असल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा लागू होत नाही, हा दावा ग्राह्य नसल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

  • 02 Oct 2026 08:20 AM (IST)

    दुष्काळग्रस्त माळशिरसमध्ये उजनीच्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाया

    सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसत असताना, उजनीच्या उजव्या कालव्यातून लाखो लिटर पाणी ओव्हरफ्लो होऊन वाया जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पाणीगळतीबाबत अधिकाऱ्यांना वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे याचा निषेध म्हणून युवा सेनेचे अध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी ओव्हरफ्लोच्या पाण्यातच आंघोळ करत अनोखे आंदोलन केले दुष्काळात पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना कालव्यातून पाणी वाया जात असल्याने प्रशासनाने तातडीने पाणीगळती थांबवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे

  • 02 Oct 2026 08:10 AM (IST)

    पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

    पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सुद्धा सहभागी झाले आहेत. आम्ही पत्रकारांसोबत असल्याचे वक्तव्य यावेळी रोहित पवार यांनी केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष यांचा राजीनामा तसेच स्पर्धा परीक्षेतील अनिश्चितता या संदर्भात आमदार रोहित पवार यांचे विद्यार्थ्यांसोबत पुण्यातील एस एम जोशी पुलावर कालपासून आंदोलन सुरू आहे.

  • 02 Oct 2026 08:00 AM (IST)

    आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे CJP चे मोठे आंदोलन

    आज छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे CJP चे मोठे आंदोलन होणार आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर शिवाजी पार्क गेट नंबर ६ वर सकाळ पासूनच पोलिसांचा बंदोबस्त लागला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्या च्या मागणीसाठी आज चार वाजता कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन होणार आहे. पण त्यापूर्वीच अभिजीत दिपके यांना ताब्यात घेण्यात आले आहेत.

  • 02 Oct 2026 07:57 AM (IST)

    राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महात्मा गांधी यांना आदरांजली

    आज महात्मा गांधी यांची १५७ वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राजघाटावर बापूंना आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेससह भाजप आणि इतर नेत्यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

आज 2 ऑक्टोबर, गांधी जयंती दिनी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके हे दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आंदोलन करणार आहेत. त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर स्थानिकांनीही या आंदोलनाला विरोध केला आहे. या आंदोलनापूर्वीच मोठी घडामोड घडली आहे. मुंबई पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले आहे. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर शिवाजी पार्क गेट नंबर ६ वर सकाळ पासूनच पोलिसांचा बंदोबस्त आहे.आज चार वाजता कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन होणार आहे. यामुळे आता आंदोलनाची दिशा काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

यूपीआय व्यवहारांवर व्यापारी शुल्क लागू करण्याच्या विरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज नो यूपीआय डे पुकारला आहे व्यापाऱ्यांनी युपीआय व्यवहार टाळून आंदोलनात सहभागी व्हावी असे आवाहन पुणे व्यापारी महासंघ आणि द पुना मर्चंट चेंबर या संस्थांनी केलं आहे.

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पंचनामे आणि इतर उपायांना सुरूवात झाली आहे. या काळात प्रशासनातील अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द झाली आहे. तर दांडीबहाद्दर महसूली कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीचा लाभ ही शेतकऱ्यांना मिळायला सुरूवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांची कर्ज खाती निरंक झाली आहे. तर राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला असला तरी अनेक ठिकाणी इच्छुकांच्या भाऊगर्दीचा फटका बसण्याची शक्यता आहे. बड्या नेत्यांना कार्यकर्त्यांची मनधरणी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us