AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादयाक! सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगत अधिकाऱ्यांकडून उकळले पैसे

धाराशिवमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, भाजप आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यात आले आहेत.

धक्कादयाक! सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगत अधिकाऱ्यांकडून उकळले पैसे
| Updated on: Feb 03, 2025 | 10:53 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, धाराशिवमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, भाजप आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्यात आले आहेत.  या घटनेमुळं खळबळ उडाली आहे, प्रकार समोर येताच पैसे उकळणाऱ्याला मराठा आंदोलकांकडून चोप देण्यात आला आहे. आशिष विसाळ असं या पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे.

जनआक्रोश मोर्चाच्या नावानं तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करायची आहे, असं सांगून हा व्यक्ती अधिकाऱ्यांकडे पैसे मागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या व्यक्तीने आपण सुरेश धस यांचा पीए असल्याचं देखील भासवलं, दरम्यान हा प्रकार समोर आल्यानंतर मराठा आंदोलकांनी विसाळ याला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

आशिष विसाळ हा आमदार सुरेश धस यांच्या नावावर सरकारी अधिकाऱ्यांना धमकावत त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर मराठा आंदोलकांनी या व्यक्तीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं. विशेष म्हणजे या व्यक्तीनं माजी जिल्हाधिकारी प्रवीण गोडाम यांचं नाव आणि  फोटो डीपीला ठेवला होता. आपण गोडाम यांचे खास मित्र असल्याचा दावा करत या व्यक्तीने अधिकाऱ्यांकडून पैसे उकळल्याचं समोर आलं आहे.

नाशिकचे आयुक्त आणि धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांचा फोटो डीपीला ठेवून पैसे गोळा करत असल्याचा आरोप आशिष विशाळ या व्यक्तीवर करण्यात आला आहे .  दरम्यान आता या सर्व प्रकरणावर गोडाम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माझे कार्यक्षेत्र हे नाशिक आहे, मराठवाड्यामध्ये माझे नाव सांगून जर कोणी पैसे घेत असेल तर ते पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन नाशिकचे आयुक्त आणि धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी केले आहे. या व्यक्तीला मराठा आंदोलकांनी चांगलाच चोप दिला आहे, त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंआहे, घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...