आदिवासी भागातील नक्षलवाद संपला, आता…; गडचिरोलीसाठी PM मोदींसमोरच CM फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?

आदिवासी भागातील नक्षलवाद संपल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यानंतर गडचिरोलीतील आयोजित कार्यक्रमात PM मोदींसमोरच CM फडणवीसांची मोठी घोषणा केली.

आदिवासी भागातील नक्षलवाद संपला, आता...; गडचिरोलीसाठी PM मोदींसमोरच CM फडणवीसांची मोठी घोषणा, काय म्हणाले?
devendra fadnavis news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 11:42 AM

गडचिरोलीत भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदिवासी बांधवांना संबोधित केले. गडचिरोलीतील जनजीवन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आदिवासी समाजाच्या विकासावर भाष्य केलं. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन हजेरी लावली. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या समोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली.

सरकारी योजना राबवल्याने नक्षलवाद संपला – देवेंद्र फडणवीस 

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘ संपूर्ण भारताचा कार्यक्रम आयोजन करण्याचा मान हा गडचिरोली, महाराष्ट्राला मिळाला. त्यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. आदिवासी समाजाचा इतिहास मोठा आहे. स्वातंत्र्य लढ्यात नायक लढले. मात्र त्यांचा संघर्ष शिकवला नाही. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात हे काम झालं. गडचिरोलीच्या निवडीसाठी धन्यवाद.  सोनेरी इतिहास पुढे येत आहे. आदिवासींना संपविण्याचे काम इंग्रजांनी चालविले होते. परंतु भगवान बिरसा मुंडा यांनी स्वाभिमान परत मिळवून दिला. आता आदिवासी गावांमध्ये योजना पोहोचत आहेत.  आदिवासींना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन दिले. अनेक योजना राबविल्याने नक्षलवाद संपला. गडचिरोलीने प्रथमच विकास पाहिलाय. या जिल्ह्याला विकसित करणार आहे’.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, बिरसा मुंडा यांना कोटी-कोटी प्रणाम.  जनजातीय गौरव दिनाच्या शुभेच्छा, हा ऐतिहासिक दिवस आहे. लुबाडणूक, फसवणूक आणि धर्मांतर या विरोधात बिरसा मुंडा यांनी संघर्ष केला. त्यांना कोटी कोटी वंदन.  आदिवासी समाजाला पाठबळ देणारा कार्यक्रम आहे. बिरसा मुंडा म्हणजे आदिवासींचा स्वाभिमान.  आदिवासींच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या नक्षल्यांचा खात्मा मोदींनी केला.  शेवटच्या घरात राहणाऱ्या आदिवासींपर्यंत विकास पोहोचतोय. गडचिरोली शेवटचा नाही. विकासाचा पहिला जिल्हा ठरेल,आधुनिक विकासाचं काम सरकारकडून सुरू आहे’. दरम्यान, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑनलाईन आदिवासी बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. तर आदिवासी बांधवांनी दिलखुलासपणे त्यांच्या समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यावर उपाय देखील सुचवले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us