Devendra Fadnavis : सातारा ड्रग्स प्रकरणात एकनाथ शिंदेंवर होत असलेल्या आरोपांवर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं उत्तर
"पुढचा टप्पा भारतीय कंपन्यांनी साधनं बनवावी हा असेल. जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर करुन चीन पुढे गेलाय. मात्र,आपल्याला तसं करायची गरज नाही. आपण इनोव्हेशनसाठी सक्षम आहोत" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सातारा ड्रग्स प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “सर्वप्रथम मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो. हा जो काही धंदा तिथे चाललेला, त्याचा पदार्फाश केला. पोलिसांनी मोठी कारवाई केली” असं ते म्हणाले. “या प्रकरणात जाणीवपूर्वक राजकीय दृष्टया एकनाथ शिंदे यांचं नाव आणण्याचा प्रयत्न चालला आहे. ते चुकीचं आहे. निषेधार्ह आहे. आतापर्यंत जे काही पुरावे आले आहेत, त्यांचा शिंदे यांच्या कुटुंबाशी दुरान्वयेही संबंध नाही. कुठेतरी दिशाभूल करुन अशा प्रकारे संबंध जोडणं योग्य नाही” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम कॉन्फरन्स कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. यावेळी ते बोलत होते.
“हिंदू ही जीवनपद्धती आहे. विचार पद्धती आहे. प्राचीन व्यवस्था आहे, ज्याने हजारो वर्ष आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवलं. एकच सभ्यता आहे ती भारतीय सभ्यता आहे, मग त्याला सिंधू सभ्यता देखील म्हणू शकतो, जी कन्टुनिअस सिव्हिलायझेशन मधून स्थापित झालेली दिसते. स्टोन एजमध्ये भारतीय सभ्यता विकसित रुपमध्ये होती. समृद्ध देशच जग चालवतात. त्यामुळे आपल्याला समृद्ध देश म्हणून स्थापित करावं लागेल. आपण इनोव्हेटर्सच आहोत. खगोल आणि भूगोल माहिती नव्हतं, मात्र आपल्या यात ते दिसतं” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मॅन्युफॅक्चरिंग आणि इनोव्हेशन दोघे एकत्र पुढे जातायत
“विना सुपर कम्प्युटर आपण खगोल विज्ञान समजून घेतलं होतं. आपण आता पाचव्या औद्योगिक क्रांतीत जातोय. इनोव्हेशन बेस औद्योगिक क्रांतीत आपण जातोय. मॅन्युफॅक्चरिंग आणि इनोव्हेशन दोघे एकत्र पुढे जातायत. चौथी औद्योगिक क्रांती आपण कॅच करण्याचा प्रयत्न केला. मात्र,पूर्णपणे आपण नाही करु शकलो. मात्र 5 वी औद्योगिक क्रांतीची ताकद आपल्यात आहे. सत्या नडेला यांनी आमच्याकडे प्रेझेन्टेशन दिलं. त्यात डेव्हलपर्सच्या दृष्टीने सर्वात पहिल्या क्रमांकावर भारत असणार असं त्यांनी सांगितलं” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आपण आत्मनिर्भर नाही बनू शकलो तर अडचणी निर्माण होतील
“चीन चौथ्या क्रमांकावर असेल. आपण सिलिकॉन व्हॅलीला डॉमिनेट केलं. तसंच मॅन्चुफॅक्चरिंगमध्ये देखील करु असा विश्वास मला आहे. स्वदेशीशिवाय भारत पुढे नाही जाऊ शकत. आपण आत्मनिर्भर नाही बनू शकलो तर अडचणी निर्माण होतील. आपल्या देशात जे बनतं ते स्वदेशी. जे भारतात तयार होतं आणि जगासाठी जातं ते महत्त्वाचं आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
