अरे ट्रॅफिक सोडा तो… का अडवून धरलाय…मुख्यमंत्री साहेबांचा आदेश येताच तारांबळ; नेमकं काय घडलं?

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी शिकण्यासाठी मुदत मिळणार नाही, कारवाई होईल, अशी भूमिका घेतली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांनी मात्र अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्ष संधी दिली आहे.

अरे ट्रॅफिक सोडा तो... का अडवून धरलाय...मुख्यमंत्री साहेबांचा आदेश येताच तारांबळ; नेमकं काय घडलं?
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 27, 2026 | 6:13 PM

Devendra Fadnavis : रिक्षा, टॅक्सीचालकांना मराठी बोलणे सक्तीचे करण्यात आले. प्रवाशांसी संवाद साधण्यासाठी जुजबी मराठी येणे गरजेचे आहे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. परंतु सरकारच्या या नियमाला अनेक भागात विरोध करण्यात आला. मराठी एवढ्या लवकर शिकता येणार नाही, मुदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोर येत मराठी शिक्षण्यासाठी एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती दिली. ते पत्रकारांशी संवाद साधत होते. दरम्यान, यावेळी असं काही घडलं की मुख्यमंत्री साहेबांनी हात वर करत एक फर्मान सोडलं. त्यानंतर वाहतूक पोलीस लगेच कामाला लागले.

नेमकं काय घडलं?

अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी आणखी एका वर्षाची मुदत देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. पत्रकारांंना या निर्णयाबाबत ते सांगत होते. याच वेळी मुख्यमंत्री समोर असल्याने वाहतूक पोलिसांनी ट्रॅफिक रोखून धरले होते. मुख्यमंत्री उभे असलेल्या ठिकाणी गर्दी होत होती. वाहनांचीही संख्या वाढत असल्याने ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता होती. हीच बाब फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यानंतर लगेच माध्यमांसमोरच त्यांनी पोलिसांना आदेश दिला. ‘अरे ट्रॅफिक का अडवून धरलं आहे. ट्रॅफिक अगोदर सोडा,’ असा थेट आदेशच त्यांनी पोलिसांना देऊन टाकला. थेट मुख्यमंत्री साहेबांचा हा आदेश आल्याने पोलिसांची काही वेळेसाठी तारांबळ उडाली. वाहतूक पोलिसांनी रोखून धरलेलं ट्रॅफिक लगेच सोडून दिलं. रस्ता मोकळा करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी अमराठी रिक्षा-टॅक्सीचालकांबाबत काय निर्णय घेतला?

दरम्यान, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी शिकण्यासाठी मुदत मिळणार नाही, कारवाई होईल, अशी भूमिका घेतली होती. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवस यांनी मात्र अमराठी रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्ष संधी दिली आहे. तोपर्यंत कोणावरही कारवाई केली जाणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयाचे अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांकडून स्वागत केले जात आहे.

Follow Us