Devendra Fadnavis : भारत एकादिवसात डोक्यावरचं किती परदेशी कर्ज फेडू शकतो? फडणवीसांनी आकडाच सांगितला

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाने कशी आणि किती प्रगती केलीय त्या बद्दल माहिती दिली. यात परदेशी कर्ज फेडण्याच्या क्षमतेचा सांगितलेला आकडा इंटरेस्टिंग आहे.

Devendra Fadnavis : भारत एकादिवसात डोक्यावरचं किती परदेशी कर्ज फेडू शकतो? फडणवीसांनी आकडाच सांगितला
Devendra Fadnavis
| Updated on: Jun 12, 2026 | 12:52 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 12 वर्ष पंतप्रधानपद भूषवून एक विक्रम केला आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. मोदी यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देश कसा प्रगती पथावर आहे, भारताचा किती वेगाने विकास सुरु आहे, ते आकड्यांसह सांगितलं. “भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. मंदी, मंदी चालू होतं, पण भारताचा आर्थिक विकासाचा दर 7 टक्क्याहून अधिक आहे. जगात सर्वाधिक विकास वृद्धीचा दर भारतात आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “भारताची वेगवान अर्थव्यवस्था आहे. 345 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. 5 ट्रिलियन इकोनॉमीकडे भारताची वेगाने वाटचाल सुरु आहे. भारताकडे आज परदेशी मु्द्रा भांडार 67 लाख कोटी रुपये आहे. पुढच्या 11 महिन्यांची सर्व आयात, भारतावर जे विदेशी कर्ज आहे, ते कव्हर करण्याची 94 टक्के आपली क्षमता आहे” असं फडणवीस यांनी सांगितलं.

“आधी परदेशी कर्जात बुडालेला भारत अशी स्थिती होती. त्यावेळी भारताकडे कर्ज फेडायचे पैसे नसायचे. पण आज एकदिवसात 94 टक्के कर्ज फेडण्याची आपली क्षमता आहे. अशा पद्धतीने 11 महिन्यांची आयात करण्याची क्षमता आहे. यूपीए सरकारच्या काळात एका महिन्याच्या आयातीची क्षमता नव्हती. आज 11 महिन्याची आयात करु शकतो इतकी क्षमता आहे” असं फडणवीस यांनी सांगितलं. “जीएसटी कलेक्शन 22 लाख कोटींवर गेलं आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. यूपीए व्यवहारात 12 हजार पटीने वाढ झाली आहे. 314 लाख कोटींचे डिजिटल व्यवहार सुरु आहेत. आपण चीनलाही मागे टाकलय. आपण तयार केलेलं UPI आज जगातले 30 देश वापरत आहेत. आता ब्राझीलही यूपीआयवर शिफ्ट होतोय ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

संयुक्त राष्ट्राकडून देखील दशकातील चमत्कारिक घटना असल्याचं मान्य

“12 वर्षाच्या कार्यकाळात 25 कोटी लोकांना गरीबीच्या बाहेर काढण्याचं काम मोदींनी केलं. संयुक्त राष्ट्राने देखील दशकातील चमत्कारिक घटना असल्याचं मान्य केलं. 81 कोटी लोकांना अन्न सुरक्षा देण्याचं काम मोदींनी केलं. शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली. शेती कर्जाची मर्यादा 3 लाखावरुन 5 लाखावर नेली. दूध उत्पादन देशात 10 वर्षात 70 टक्क्याने वाढलं. जनधन योजनेत 58 कोटीहून अधिक खाती निर्माण केली. आयुषमान भारतच्या माध्यमातून 60 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतच्या आरोग्य विम्याचं कवच मिळालं. मध्यमवर्गाकरता इन्कम टॅक्सची मर्यादा 2 लाखावरुन 12 लाख 75 हजारापर्यंत वाढवली” मोदींच्या कार्यकाळात झालेल्या या बदलांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माहिती दिली.

Follow Us