AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रासाठी मंगल दिवस!! डाव्होस परिषदेत राज्यासाठी पहिल्याच दिवशी भरभक्कम गुंतवणूक, वाचा सविस्तर

महाराष्ट्रासाठी झालेल्या भरभक्कम गुंतवणुकीविषयी उदय सामंत यांनी माहिती दिली.

महाराष्ट्रासाठी मंगल दिवस!! डाव्होस परिषदेत राज्यासाठी पहिल्याच दिवशी भरभक्कम गुंतवणूक, वाचा सविस्तर
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 17, 2023 | 8:38 AM
Share

गिरीश गायकवाड, मुंबईः महाराष्ट्रासाठी अत्यंत सुखद मंगळवार ठरावा, अशी सकारात्मक बातमी आहे. विशेषतः तरुणांसाठी आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांकरिता आशादायी वृत्त आहे. स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये (Davos) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45,900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उद्योगमंत्री उदय सामंत सध्या डाव्होस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले आहेत.

महाराष्ट्रासाठी झालेल्या भरभक्कम गुंतवणुकीविषयी उदय सामंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज आणखी एक महत्त्वाची घडामोड घडली. आज विविध कंपन्यां समवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून सुमारे 10 हजार तरूणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितली.

यावेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते.

कोणत्या कंपन्यांशी करार?

डाव्होस येथे करण्यात आलेल्या सामंजस्य कारारा बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

  1. . Greenko energy Projects Pvt.Ltd 12000 कोटींची गुंतवणूक
  2.  Berkshire Hathaway Home Services Orenda India 16000 कोटींची गुंतवणूक
  3.  ICP Investments/ Indus Capital 16000 कोटींची गुंतवणूक
  4.  Rukhi Foods कंपनीची 250 कोटींची गुंतवणूक
  5.  Nipro Pharma Packaging India Pvt. Ltd.1650 कोटींची गुंतवणूक

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा