लोकशाहीवर भाषण ठोकणाऱ्या चिमुकल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट
लोकशाहीवर भाषण करताना एका चिमुकल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. कार्तिकची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट घेतली.
जालना : काही दिवसांपूर्वी लोकशाही या विषयावर भाषण ठोकणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या चिमुकल्याची राज्यभरात जोरदार चर्चा झाली होती.कार्तिक असं या चिमुकल्याचे नाव असून त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या दरम्यान पुन्हा एकदा कार्तिकने चांगलंच भाषण ठोकलं.जालन्यातील वाटूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आले असता कार्तिक आणि मुख्यमंत्री यांच्यात भेट झाली.
प्रजासत्ताक दिनी आपल्या भाषणातून लोकशाहीची सहज आणि आपल्या आयुष्याची निगडित अशी व्याख्या करणाऱ्या कार्तिक वजीरचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. या पूर्वी मुख्यमंत्री कार्यलयाने कार्तिक सोबत फोनवर चर्चा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालन्यात आले असता कार्तिकची भेट घेऊन त्याचं भाषण पुन्हा एकदा ऐकले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

