AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थर्डी फर्स्टला पहाटे 5 वाजेपर्यंत जल्लोष! मद्यविक्रीच्या वेळेत सूट, सरकारचा मोठा निर्णय; तपासून घ्या वेळ

नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त मद्यविक्री आणि बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वेळा काय आहेत, ते तपासून घ्या..

थर्डी फर्स्टला पहाटे 5 वाजेपर्यंत जल्लोष! मद्यविक्रीच्या वेळेत सूट, सरकारचा मोठा निर्णय; तपासून घ्या वेळ
new year celebrationImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 25, 2025 | 12:51 PM
Share

देशभरात नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता पहायला मिळतेय. अशातच तळीरामांसाठी खुशखबर आहे. कारण नाताळ आणि 31 डिसेंबरनिमित्त मद्यविक्री आणि बिअर बार उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास सवलत देण्यात आली आहे. मद्यविक्रीची दुकानं रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सवलत आहे. तर पोलीस आयुक्तालये असणाऱ्या हद्दीत बिअर बार आणि इतर आस्थापनांना पहाटे 5 पर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास मंजुरी आहे. नाताळ आणि नववर्षानिमित्त 24 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी राज्यातील विविध मद्य विक्रीची दुकानं आणि बिअर बार निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत चालू ठेवण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.

अनुज्ञप्तीच्या प्रकारानुसार मद्यविक्री करण्यास किती वाजेपर्यंत सूट?

  • एफएल- 2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचं दुकान) रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी
  • उच्च दर्जाची आणि अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेली एफएल- 2 ला रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत परवानगी
  • एफएलडब्ल्यू 2 आणि एफएलबीआर 2 ला रात्री 10.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत मंजुरी
  • एफएल 3 (परवाना कक्ष) आणि एफएल 4 (क्लब अनुज्ञप्ती) यांना पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री 1.30 ते पहाटे 5 वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालयच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री 11.30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत मंजुरी आहे.
  • नमुना ई (बीअर बार) आणि ई-2 यांना मध्यरात्री 12 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी
  • सीएल 3 ला महानगरपालिका तसंच ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री 11 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत आणि इतर ठिकाणी रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 1 वाजेपर्यंत मंजुरी आहे.

वेळेत शिथिलतेची मंजुरी असली तरी सार्वजनिक शांतात, कायदा आणि सुव्यवस्था यांचा विचार करून जिल्हाधिकारी आवश्यकतेनुसार वेळेची शिथिलता कमी करू शकतील. नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळी पोलिसांचा जागोजागी चोख बंदोबस्त असणार आहे. ड्रंक अँड ड्राइव्हसारख्या घटना घडू नयेत यासाठी वाहतूक पोलीस सजग असतील. नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अवैध दारू विक्रीवर चाप बसवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथकं तैनात होतील.

नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....