
नाशिकमधील ज्योतिषी अशोक खरातला एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता या अशोक खरातचे अनेक कारनामे समोर आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. अशातच आता रूपाली चाकणकरांनी राजीनामा द्यावा असे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. यामुळे चाकणकरांवर टीका करण्यात येत होती. विरोधकांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली केली आहे, त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाशिक पोलिसांना अशोक खरात प्रकरणात मोठं यश मिळालं आहे. कॅप्टन खरातचं बिंग फोडणाऱ्या नीरज जाधवला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तो सध्या नाशिक पोलिसांच्या क्राइम ब्रांच शाखेच्या ताब्यात आहे. नीरज जाधवच्या विरोधात शिर्डीत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलीला तिचे मॉर्फ व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे. त्यामुळे आता त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. यातून अशोक खरातच्या आणखी कारनाम्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, मा.मुख्यमंत्री साहेबांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समजत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार, परंतु केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी आणि आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताशी या भोंदू बाबाचे कनेक्शन आहे का? याचाही तपास व्हायला हवा.
मा. मुख्यमंत्री साहेबांनी महिला आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे समजत आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार, परंतु केवळ राजीनामा घेऊन चालणार नाही तर या प्रकरणाच्या तळाशी जाऊन पारदर्शक चौकशी करावी आणि आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या अपघाताशी या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 20, 2026
नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, ‘या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई सरकारच्या वतीने करण्यात येईल आणि सर्व दोषींना जेरबंद करण्यात येईल. तसेच अशा पद्धतीने अनेक भोंदू बाबा आश्रम उघडतात त्यामध्ये काय कार्य करतात हे अनेक वेळा पोलिसांना देखील माहित नसते असेही बावनकुळे म्हणाले.