राज्यात पुराचं संकट, यंदा माझा वाढदिवस साजरा करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

| Updated on: Jul 25, 2021 | 3:50 PM

अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

राज्यात पुराचं संकट, यंदा माझा वाढदिवस साजरा करू नका; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : “कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला आहे. पूरामुळे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल आहे. त्यामुळे कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

उद्धव ठाकरे म्हणाले, “वाढदिवसानिमित्त कुणीही अभिष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये. तसेच फलक, पोस्टर्स लावू नये. सोशल मीडिया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू. राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत.”

“वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान द्या”

“पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडावे,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी, दुकानदारांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे व्यथा

तुमचं जे नुकसान झालं आहे. त्याची काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आज दिलं.

हेही वाचा :

Uddhav Thackeray | काळजी करू नका, सरकार सर्व मदत करणार, तळीयेच्या लोकांना मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

तळीयेच्या लोकांना सरकार सर्वतोपरी मदत करणार : आदिती तटकरे

NDRF च्या जवानानं स्वत:ची शिडी करुन वाचवलं, महिलेचा जीव

व्हिडीओ पाहा :

CM Uddhav Thackeray appeal supporter to not celebrate his birthday amid flood and land sliding