एसआयटी म्हणजे थोतांड, हिंमत असेल तर राम मंदिर दानचोरीची निवृत्ती न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, उद्धव ठाकरे यांची मागणी

उद्धव ठाकरे यांनी आज नागपूरातील राममंदिरात रामरक्षा आंदोलन करीत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंमत असेल तर राममंदिर दान पेटी प्रकरणाची चौकशी निवृ्त्त न्यायाधीशांमार्फत करा अशी मागणी केली.

एसआयटी म्हणजे थोतांड, हिंमत असेल तर राम मंदिर दानचोरीची निवृत्ती न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, उद्धव ठाकरे यांची मागणी
UDDHAV THACKERAY
| Updated on: Jul 18, 2026 | 5:19 PM

नागपूर येथील राममंदिरात आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करीत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राम मंदिरातील दान पेटीतील चोरीसाठी नेमलेली एसआयटी म्हणजे थोतांड आहे. राम मंदिराच्या दान चोरीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा. निवृत्ती न्यायाधीशही निस्पृह असावेत. अभय ओक यांच्यासारखे न्यायमूर्ती नेमा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

उद्धव ठाकरे नागपूरातील सभेत म्हणाले की, मंदिर वही बनायेंगे.. कशाला बनाने के बाद लुटण्यासाठी का ?. आम्ही लुटारूंच्या विरोधात आहोत. आमची चेष्टा मस्करी करण्यापेक्षा फडणवीस यांनी लुटणाऱ्यांच्या बाजूने की राम रक्षा करणाऱ्यांच्या बाजूने आहात हे स्पष्ट करा. हे आंदोालन राम रक्षा पाठ आहे की नाही हे बघण्यासाठी नाही. एखाद्या वर्गातील मॉनिटर बोलू नका. आज राम भक्तांना रामाचं संरक्षण वेळ येते. भाजपच्या कारभारात करावी लागते. यापेक्षा दुर्देव कोणतं.

अयोध्या, केदारनाथ मंदिर आदी ठिकाणी घोटाळे झाले. उज्जैनमध्ये घोटाळा झाला. अयोध्येत जमीन घोटाळा झाला. साधू आज राग व्यक्त करत आहे. एका साधूने सांगितलं हे मंदिर नाही. हे पैसा गोळा करण्याचं भाजपचं केंद्र झालं आहे. एटीएम. इथे जो काही पैसा गोळा केला. त्यातून आमदार खासदार विकत घेतले गेले. मला त्या गद्दारांनाही विचारायचं आहे. बाळासाहेबांचे विचार सोडल्याचा आरोप करत होतात. मंदिर चोराला आम्ही जाब विचारायला उभे आहोत असेही उद्धव ठाकरे यावेळी कडाडले.

उद्धव ठाकरे म्हणाले की  तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही भाजपला सवाल करा. त्यांच्या घरचे पाणके होऊ नका. गद्दाराच्या अंगात हिंदुत्वाचं रक्त असेल तर मंदिर चोरांविरोधात भूमिका स्पष्ट केली पाहिजे. जमलेल्यांच्या डोक्यावर भगव्या टोप्या नाहीत, मी काही भगवा झेंडा, भगवा झब्बा गंमत म्हणून घेतला नाही. ही काही नाटक कंपनी नाही असेही टोला त्यांनी लगावला.

भाजपने आमच्यासोबत गद्दारी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. तेव्हा हिंदुत्व सोडल्याचं बोलत होते. आता भाजपला विचारतो तुम्ही का हिंदुत्व सोडलं ? असा सवाल केला आहे. ते पुढे म्हणाले की एसआयटी वगैरे हे थोतांड आहे. एक विषय निर्माण झाला तर दुसरा विषय काढतात. आम्ही आता हा राम मंदिर दान पेटीतील चोरीचा  प्रश्न सोडणार नाही. महाराष्ट्रात सर्वत्र आंदोलन करू. मी स्वत: अयोध्या आणि काशी विश्वनाथला जाणार आहे.  तिथे आम्ही  महाआरती करणार आहोत.  तुम्ही चौकशीची थेरं करू नका. नाटकं करू नका. प्रामाणिकपणे निकाल लावायचे असेल तर निवृत्त न्यायाधीशांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन करा. अभय ओकांसारखे निवृत्त न्यायाधीश नेमा. दूध का दूध पानी का पानी होईल अशीही मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

 

Follow Us