भाजपा खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार : नाना पटोले

| Updated on: Nov 26, 2021 | 7:25 PM

‘मी पुन्हा येणार...मी पुन्हा येणार’ म्हणणारे थकून गेले असून आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली आहे. आता नवीन कुडमुडे ज्योतिषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत.

भाजपा खोट्या भविष्यवाण्या करणारा पक्ष; महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार : नाना पटोले
महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार : नाना पटोले
Follow us on

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते रोज नव्या भविष्यवाण्या करतात पण त्यांच्या भविष्यवाण्या सातत्याने खोट्या ठरत आहेत. नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी अनेक खोट्या भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यांच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिला नसून त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ राहिलेला नाही, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, भाजपाच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, भाजपाचे नेते मागील दोन वर्षापासून मविआ सरकार पडणार अशा भविष्यवाण्या नेहमीच करत असतात पण त्यांचे भविष्य काही खरे ठरत नाही. महाविकास आघाडीला दोन वर्ष झाली तरी त्यांना अजूनही दररोज सरकार पडण्याचीच स्वप्ने पडत आहेत. मात्र त्यांची भविष्यवाणी काही खरी ठरणार नाही.

‘मी पुन्हा येणार…मी पुन्हा येणार’ म्हणणारे थकून गेले असून आता त्यांना वास्तवाची जाणीव झाली आहे. आता नवीन कुडमुडे ज्योतिषी उदयास आले असून ते सरकार पडण्याची भविष्यवाणी करु लागले आहेत. त्यांची ही भविष्यवाणीही खोटी ठरणार असून महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालेल व महाराष्ट्राचा विकास करेल असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

नारायण राणेंच्या भविष्यवाणीवर पटोलेंची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकार मार्चमध्ये कोसळणार अशी भविष्यवाणी केली आहे. राणेंच्या या भविष्यवाणीचा समाचार घेत नाना पटोलेंनी त्यांची खिल्ली उडवली आहे. राणेंवर टीका करताना, भाजप खोटी भविष्यवाणी करणारा पक्ष आहे, त्यांच्या भविष्यवाणीला काही अर्थ नाही, असे पटोले यांनी म्हटले आहे. भाजपची भविष्यवाणी गेली दोन वर्षे सुरु आहे. मात्र महाविकास आघाडी पाच वर्षे पूर्ण करेल, असा विश्वास पटोलेंनी मीडिया बोलताना व्यक्ती केला.

तसेच राष्ट्रवादीबाबत विधानाबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. छोटू भोयर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवाधी दुखावेल किंवा महाविकास आघाडीत फूट पडेल, असं कोणतंही वक्तव्य आम्ही केलेलं नाही, असेही पटोलेंनी स्पष्ट केले. (Congress leader nana patole reaction on narayan rane statement regarding mahavikas aghadi)

इतर बातम्या

भाजपचा राष्ट्रवाद बोगस, त्यांना पुन्हा वर्ण व्यवस्था आणायचीय; नवाब मलिकांचा घणाघात

निवडणुकीचा धुरळा ! राज्यात 27 हजार सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा