पृथ्वीराजबाबा मानलं… जखमी आजीबाईंना स्वत:च्या गाडीतून पोहोचवलं रुग्णालयात

पृथ्वीराजबाबा मानलं... जखमी आजीबाईंना स्वत:च्या गाडीतून पोहोचवलं रुग्णालयात
पृथ्वीराज चव्हाण सोमवारी कराडच्या सैदापूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून परतत असताना सैदापूर कॅनॉलजवळ त्यांना लोकांची गर्दी दिसली.

सैदापूर कॅनॉलजवळ त्यांना लोकांची गर्दी दिसली. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. | Prithviraj Chavan

Rohit Dhamnaskar

|

Jan 25, 2021 | 8:06 PM

कराड: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्याबाबत सोमवारी घडलेल्या एका किस्स्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. पृथ्वीराज चव्हाण सोमवारी कराडच्या सैदापूर येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून परतत असताना सैदापूर कॅनॉलजवळ त्यांना लोकांची गर्दी दिसली. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले. (Prithviraj Chavan help old woman injured in road accident near Karad)

यावेळी चौकशी केली असता या रस्त्यावर झालेल्या अपघातात एक वृद्ध महिला जखमी झाल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांना समजले. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी गाडीतून खाली उतरत वृद्धेची विचारपूस केली. एवढेच नव्हे तर आपल्या ताफ्यातील एक गाडी देऊन या वृद्ध महिलेला रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली.

या वृद्ध महिलेच्या हाताला जबर मार लागला होता. तसेच आजीबाईंच्या डोक्यालाही दुखापत झाली होती. त्यामुळे आजीबाईंना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे गरजेचे होते. पृथ्वीराज चव्हाण मदतीला धावून आल्यामुळे ते शक्य झाले. आजपर्यंत कराडमधील जनतेने पृथ्वीराज चव्हाण यांची गुणात्मक कामगिरी पाहिली होती. मात्र, आज त्यांच्यातील संवेदनशीलतेचे दर्शन झाल्याने नागरिक भारावून गेले. त्यामुळे कराड परिसर आणि सोशल मीडियावर या प्रसंगाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

रोहित पवारांनी मारला कारला धक्का

काही दिवसांपूर्वी सांगलीच्या माण तालुक्यात झालेल्या अपघातावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवारही असेच मदतीला धावून गेले होते. रोहित पवार हे माण तालुक्यातील मांडवे-पिंगळी येथेून जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्याकडेला एका शेतकऱ्याच्या ओमनी कारला अपघात झाल्याचं दिसलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडी थांबवून आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ही ओमनी कार खड्ड्यातून बाहेर काढण्यास मदत केली. ओमनी कार बाहेर काढल्यानंतर त्यांनी तात्काळ अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि डॉक्टरांशी बोलून त्यांच्यावर उपचार करण्यास सांगितले. त्यामुळे या अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळू शकले.

संबंधित बातम्या:

रोहित पवार अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले; ओमनी कारला धक्का मारून खड्ड्यातून बाहेर काढलं

(Prithviraj Chavan help old woman injured in road accident near Karad)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें