Narayan Rane : एवढं प्रेम उतू जातय तर, भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का? नारायण राणेंचा सवाल

"राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का? हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आमच्या मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. शेवटी घरं आहे, बंधुत्व आहे. कोणी कुठे जावं हा व्यक्तीगत प्रश्न आहे"

Narayan Rane : एवढं प्रेम उतू जातय तर, भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का? नारायण राणेंचा सवाल
Narayan Rane
| Updated on: Jul 02, 2025 | 3:23 PM

“काय भविष्य? भविष्य असतं तर हे वेगळे झाले असते का? सत्ताधारी पक्षाची संख्या 235. आता यांना मराठी माणूस आठवला. त्यांच्यासाठी काय केलं. आज मराठी टक्का 18 टक्के फक्त. 1960 साली 60 टक्के होता. याचं कारण काय? मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना मग गेली कुठे?” असा सवाल नारायण राणे यांनी विचारला. “त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले. मुख्यमंत्रीपदाचं महत्त्व नाही. काय केलं महाराष्ट्रासाठी?: मराठी माणसासाठी, तरुणासाठी, नोकरीसाठी. पोटापाण्याच्या प्रश्नासाठी. ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला, ताकद दिली. शिवसेनेने त्यांच्या नावावर उदरनिर्वाह चालवला. हेच लोक आता मराठी भाषेचा आंनदोत्सव साजरा करतायत. मराठी माणसासाठी, हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेंना अधिकार नाही” असं नारायण राणे म्हणाले.

“राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जात आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का? हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. आमच्या मार्गदर्शनाचा प्रश्न नाही. शेवटी घरं आहे, बंधुत्व आहे. कोणी कुठे जावं हा व्यक्तीगत प्रश्न आहे” असं नारायण राणे म्हणाले. “राज यांनी शिवसेनेत यावं, असं ते कधीच म्हणू शकत नाही. कारण तसं झाल्यास अस्तित्वच राहणार नाही. राज शिवसेनेत आला की, तो प्रमुख होणार. उद्धव ठाकरे नगण्य. तो नाही बोलवणार” असं नारायण राणे म्हणाले.

मग मुलांना का इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकवलं

“बाळासाहेबांनी 48 वर्षात जे कमावलं, ते याने अडीच वर्षात साफ करुन टाकलं. ओरिजन शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे आहे” असं नारायण राणे म्हणाले. “मराठीचा पुळका आलाय मग मुलांना का इंग्रजी मीडियमच्या शाळेत शिकवलं. स्कॉटिशमध्ये कोणाला पाठवलं, याचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी ते उदहारण दिलं” असं नारायण राणे म्हणाले.

मातोश्रीचा एक भाग देतोस का?

दोन भाऊ एकत्र येतात हा भाजपला प्रॉब्लेम आहे असं उद्धव ठाकरे म्हणतात. “दोन भाऊच कशाला, सगळे भाऊ घ्या. आम्हला फरक पडत नाही. भाजप आणि आघाडीचे तिन्ही पक्षांचे आज 235 आमदार आहेत. एवढं प्रेम उतू जातय तर, मातोश्रीचा एक भाग देतोस का?” असं सवाल नारायण राणेंनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us