AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बागेश्वर बाबांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; संभाजीराजेंचा संताप, म्हणाले अशा भोंदू बाबांना…

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता चांगलंच वातावरण तापलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी यावरून धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बागेश्वर बाबांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; संभाजीराजेंचा संताप, म्हणाले अशा भोंदू बाबांना...
Sambhaji Raje ChhatrapatiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 26, 2026 | 9:12 PM
Share

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता चांगलंच वातावरण तापलं आहे.‘छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपला मुकुट काढला व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाही. तुम्ही एक दया करा की, हा मुकुट तुम्ही आता सांभाळा, हे राज्य सांभाळा.’ असं वादग्रस्त विधान बागेश्वर बाबा यांनी केलं होतं. यावरून आता संभाजीराजे छत्रपती यांनी बागेश्वर बाबा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

‘धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवजात, राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केले पाहिजे. राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी.’ असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील बागेश्वर बाबा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘विकृत धीरेंद्र शास्त्रीने (बागेश्वर बाबा) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गरळ ओकली आणि तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच विकृताचा उल्लेख ‘साधू-संत’ असा केला. हा महाराष्ट्राच्या महान संत परंपरेचा अपमानच आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराजांपासून ते आधुनिक काळातील गाडगे बाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या वाणी आणि लेखणीने समृद्ध केलेल्या संत परंपरेशी या ढोंगी बागेश्वर बाबाला जोडताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटली पाहिजे. त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे.’ असं ट्विट हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी
सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
Bhimashankar Torrent Project : Raj Thackeray : सकाळी वृक्षतोडस्थळाची पाहणी तर, सायंकाळी राज ठाकरेंची जाहीर सभा
मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत...
Marathwada MLC Election Result : मतपेटीत चिठ्ठ्या टाकून मतदारांचा संताप; असला आमदार नको गं बाई म्हणत नाराजी व्यक्त
शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद
Shivsena : शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा युक्तिवाद; महाराष्ट्राचं लक्ष
पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु....
Maharashtra MLC Result 2026 : पुणे पदवीधरसाठी दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु
20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा..
Marathwada MLC Election Results 2026 : 20 हजारांहून अधिक मतं अपक्षाच्या खात्यात; रविराज साबळेंमुळे मराठवाडा पदवीधरचा निकाल बदलणार?
पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी?
Maharashtra MLC Election Final Results 2026 : पदवीधर मतदारसंघात महायुती की मविआ कोण मारणार बाजी? निकालाकडे सर्वांचं लक्ष
कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती मतांची गरज....
Harshada Deshmukh : Maharashtra MLC Election Final Results 2026 : कोटा पूर्ण करण्यासाठी हर्षदा देशमुख यांना किती  मतांची गरज; पुणे पदवीधर निवडणुकीत काय घडणार?
नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर?
Maharashtra MLC Election Result 2026 : नागपूर ते मराठवाडा, मतमोजणीत मोठी चुरस; कुठे कोण आघाडीवर? विधान परिषद निवडणुकीचे ताजे चित्र
कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा...
MLC Election Results 2026: कोणता पक्ष कुठे आघाडीवर, कुठे पिछाडीवर? शिक्षक, पदवीधरमध्ये कुणाचा डंका; पाहा A टू Z