AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेत चक्क नमाज पठण! नाशिकमध्ये खळबळ, प्रकरण काय?

Malegaon News : मालेगाव महापालिकेच्या एका सरकारी कार्यालयात सामुदायिक नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या नमाज पठणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

महापालिकेत चक्क नमाज पठण! नाशिकमध्ये खळबळ, प्रकरण काय?
MalegaonImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 26, 2026 | 12:38 PM
Share

मालेगाव: हिरा ढाकणे, प्रतिनिधी| मालेगाव महानगरपालिका पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. यापूर्वी उपमहापौर शान-ए-हिंद यांनी कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. आता महापालिकेच्या विद्युत विभागात सामुदायिक नमाज पठण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

प्रकरण काय आहे?

मालेगावच्या प्रभाग ४ (किंवा काही रिपोर्ट्सनुसार प्रभाग १५) मधील पवारवाडी परिसरात रस्त्यावरील पथदीप (स्ट्रीट लाइट्स) सुरू करण्याची मागणी स्थानिक नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. वारंवार निवेदने देऊनही महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी लोकसंघर्ष समितीचे अध्यक्ष लुकमान कमाल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या विद्युत विभागात ठिय्या आंदोलन सुरू केले.

आंदोलक अधिकारी येण्याची वाट पाहत बसले असताना, विद्युत विभागातील अधिकारी बैठकीचे कारण सांगून बाहेर गेले आणि बराच वेळ परत आले नाहीत. याच वेळी नमाजची वेळ झाली होती. सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू असल्याने आणि आंदोलनामुळे बाहेर जाणे शक्य नसल्याने, आंदोलकांनी कार्यालयातच जाजम पसरवून सामुदायिक नमाज पठण केले. नमाजचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला, जो प्रचंड व्हायरल झाला आहे. सरकारी कार्यालयात धार्मिक विधी पार पाडल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात सात जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. भातीय दंड संहिता (आयपीसी)च्या कलम १३२, १८९(२), १९० आणि २९२ (सरकारी सेवकावर हल्ला, बेकायदेशीर सभा आणि संबंधित तरतुदी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१), ३७(३) आणि १३५ अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की महानगरपालिका कार्यालयात अनधिकृतपणे जमून नमाज पठण केल्याच्या घटनेचा तपास सुरू आहे. आरोपींची ओळख पटली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे असे देखील सांगण्यात आले आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या