AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाचा नाशिकमध्ये पुन्हा एक बळी; किती आहेत रुग्ण, काय आहे आजचा रिपोर्ट?

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 65 हजार 566 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 846 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 142 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

कोरोनाचा नाशिकमध्ये पुन्हा एक बळी; किती आहेत रुग्ण, काय आहे आजचा रिपोर्ट?
प्रातिनिधिक छायाचित्र
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Feb 20, 2022 | 5:09 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) कोरोना (Corona) रुग्णांचे बळी थांबताना दिसत नाहीत. त्यात पुन्हा एका रुग्णाचा 19 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नाशिक महापालिका हद्दीतील हा रुग्ण आहे. नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 65 हजार 566 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 846 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 142 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. जिल्ह्यात सध्या बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनचे (Omicron) आहेत. त्यामुळे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी आहे.

आजचे रुग्ण किती?

उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णात नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 47, बागलाण 46, चांदवड 38, देवळा 21, दिंडोरी 44, इगतपुरी 15, कळवण 52, मालेगाव 10, नांदगाव 30, निफाड 112, पेठ 16, सिन्नर 52, सुरगाणा 51, त्र्यंबकेश्वर 42, येवला 62 असे एकूण 638 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 167, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 10 तर जिल्ह्याबाहेरील 35 रुग्ण असून, असे एकूण 846 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 75 हजार 298 रुग्ण आढळून आले आहेत.

किती रुग्ण बरे?

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.21 टक्के, नाशिक शहरात 98.44 टक्के, मालेगावमध्ये 97.30 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 98.06 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.95 टक्के इतके आहे. कोरोनामुळे नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 297 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 99, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 886 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अचानक वाढले मृत्यू

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाच्या 33 रुग्णांचा मृत्यू झाला. 6 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान हे बळी गेले. यातले 18 मृत्यू हे नाशिक महापालिका क्षेत्रात तर 16 मृत्यू हे नाशिकच्या ग्रामीण भागात झाले. त्यानंतरही सोमवारी, 14 फेब्रुवारी रोजी सुद्धा 4, मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी 4 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी, 16 फेब्रुवारी एक, 17 फेब्रुवारी रोजी गुरुवारी एकाचा, 18 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी पुन्हा एकाचा आणि 19 फेब्रुवारी रोजी रविवारी पुन्हा एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिकमधील कोरोनाचे मृत्यू तांडव थांबणार कधी, असा सवाल आता निर्माण होत आहे.

इतर बातम्याः

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...