
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात देशात 46 हजार 148 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 58 हजार 578 जणांनी कोरोनावर मात केलीय. 979 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 5 लाख 72 हजार 994 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi 01 July 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates
अकोला : आज दिवसभरात 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकाचा मृत्यू
आतापर्यंत 1128 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 56118 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 353 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 27 जण कोरोनामुक्त झाले आहेत
अहमदनगर : विकेंडला पर्यटनस्थळांवर बंदी
भंडारदरा, कळसुबाई व परिसरातील अभयारण्यात पर्यटनाला बंदी
कोरोनाच्या नियमावलीमुळे स्थानिक ग्रामस्थ, प्रशासन व वनविभागाचा संयुक्त निर्णय
शनिवार आणि रविवारला पर्यटन स्थळी पर्यटकांना बंदी
पुढील आदेश येईपर्यंत बैठकीत सर्वानुमते निर्णय
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 286 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 113 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधीत 13 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 07
-285 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 478803
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2704
– एकूण मृत्यू -8594
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 467505
– नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी
– सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात शुन्य कोरोना मृत्यूची नोंद
– गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७६२७ चाचण्या, ३४ नवे कोरोना रुग्ण
– जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या आली २६३ वर
– जिल्ह्यातील रिकव्हरी रेट ९८.०५ टक्क्यांवर
गडचिरोली जिल्ह्यातील 30 जूननंतर धान खरेदी केंद्र बंद
गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातही 97 धान खरेदी केंद्र आज एक जुलैपासून बंद करण्यात आलेले आहे
वेळेवर धान्य खरेदी केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांचा मोठा नुकसान होत असून अनेक शेतकऱ्यांचे धान शेतात किंवा गोंडवाना समोर साठवण करून ठेवलेली आहे
ऑनलाइन प्रक्रियेत सातबारा पूर्ण झालेले पण धान्य खरेदी न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजगी
गडचिरोली जिल्ह्यात हजारो क्विंटल धान उर्वरित
आदिवासी विकास महामंडळाच्या वेळेवर निर्णय
जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक शेतकऱ्यांचे निवेदन
राजेश टोपे :
केंद्राकडून लस न आल्याने राज्यात लसीकरणाला ब्रेक लागला होता
अशातच आज 9 लाख लस आल्याने लसीकरण सुरू करण्यात येणार आहे
रोज राज्यात दहा लाख लसीकरण केले जाऊ शकते
त्यामुळे केंद्र सरकारकडून अधिक लस पुरवठा होण्याची गरज आहे
अजित पवार भाषण पॉईंट्स
अभ्यासक्रमात बदल करण्याची गरज
अधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन शिक्षण देण्याची गरज
स्मार्ट सिटीच्या वाटवर नाशिक वेगाने पुढे चाललंय
पुणे नाशिक रेल्वेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करणार
कोरोना संकट असलं तरी मविआ च सरकार विकासाला खंड पडणार नाही असं काम करत आहे
देहू –
काल्याचं किर्तन आता समाप्त होईल,
यानंतर मानाच्या वारकऱ्यांना मानाचा नारळ दिला जाईल,
बरोबर 1 वाजता तुकारामांच्या पादूका या भजनी मंडपात येतील,
खासदार छत्रपती संभाजीराजे सपत्नीक करणार पादूकांची पुजा,
दोन वाजता प्रस्थान सोहळ्याला होणार सुरुवात
– दुकानं ऊघडी ठेवण्याच्या सरकारच्या वेळेच्या मर्यादेवर व्यापारी असोसिएशन नाराज
– दुकानं ऊघडी ठेवण्याची वेळ रात्री ८ वाजेपर्यंत करा अशी मागणी
– एफआरटीएचे अध्यक्ष विरेन शाह यांचा मुंक्यमंत्र्यांना सवाल, ४ वाजेपर्यंत दुकानं ऊघडी ठेवण्याचा निर्णय हा प्रमक्टिकल नाही
– देशभरात अनलाॅक होत असताना महाराष््पात तिसर्या लाटेच्या बातम्या, डेल्टा व्हायरसची चर्चा ही कोटींचं नुकसान करणारी आहे
औरंगाबाद –
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालरोग तज्ज्ञांच्या जागा भरणे सुरू..
महापालिकेत घेण्यात आल्या बाल रोग तज्ञांच्या मुलाखती..
आठ जागांसाठी 12 जणांचे अर्ज प्राप्त..
उमेदवारांची नियुक्ती करून ठेवण्यात येणार असून गरज असेल तेव्हा उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याचा प्रशासनाचा निर्णय..
कंत्राटी पद्धतीवर बाल रोग तज्ञ यांची होणार नियुक्ती
नाशिक –
कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा,जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचं नाशिककरांना आवाहन
– कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही
– बाजारातील दररोजची गर्दी बघता प्रशासन अधिक कठोर निर्बंध लावण्याच्या विचारात
– बाजारात सर्रासपणे होतय नियमांचं उल्लंघन
– रुग्णसंख्यची दिलासादायक घट होत असताना नागरिक मात्र बेजबाबदारपणे वावरतात
पुणे –
– पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी,
– तब्बल ५१ टक्के नागरिकांना लसीकरणामुळे आरोग्याला धोका निर्माण होईल अशी भीती,
– तर लसीकरणाबाबत चुकीची व अर्धवट माहिती मिळाल्याने ३० टक्के नागरिक लसीकरणापासून लांब,
– सर्वेक्षणातून हि चिंताजनक माहिती समोर,
– त्यामुळे एकीकडे झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा निर्णयाचे स्वागत होत असताना दुसरीकडे याभागात लसीकरणाचा टक्का वाढविण्याचे उद्दिष्ट,
– आकांक्षा फाउंडेशन, टिच फॉर इंडिया आणि आय टिच स्कूल्स या संस्थांच्या माध्यमातून सर्वेक्षण
वसई-विरार
वसई विरार मध्ये मागच्या 24 तासात 120 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ…
4 जणांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू तर 89 जणांनी केली कोरोनावर मात
वसई विरार महापालिका हद्दीत आजपर्यंत किरोना रुग्ण संख्या 68153
कोरोनाने मृत्यू झालेली संख्या 1471
कोरोना मुक्त झालेली संख्या 65469
कोरोनावर उपचार घेत असलेले रुग्ण संख्या 1213
मुंबईतील बनावट लसीकरण प्रकरण..
या बनावट लसीकरणात ज्यांनी लस घेतलीय त्यांची ब्लड टेस्ट होणार..
या लसीव्यतिरिक्त नागरिकांना नक्की कोणतं केमिकल देण्यात आलं यासाठी होणार तपासणी, काहीजणांचे नमूने घेण्यात आले..
2600 लोकांना ही बनावट लस देण्यात आली होती यातील बऱ्याच जणांना थकवा जाणवत असल्याच्या अद्याप तक्रारी येतायत..
या सगळ्या प्रकरणाची एका विशेष पथकामार्फत चौकशी सुरू आहे ज्या पथकाचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर आहेत..
काल पोलिसांनी शिवम हॉस्पिटलमध्ये छापा टाकून या बनावट लसीच्या काही रिकाम्या व्हाईल्स जप्त केल्या असून त्या फॉरेन्सिकला पाठवण्यात आल्यात…
पुणे –
– सरकारकडून लसीचा पुरवठा न झाल्याने शहरातील महापालिकेची सर्व लसीकरण केंद्रे लसीअभावी आज बंद राहणार,
– गेल्या काही दिवसांपासून शहरात लसीकरणाने मोठा वेग घेतला होता,
– इतर शहरांच्या तुलनेने पुणे शहराला मोठ्या प्रमाणावर लस पुरवठा होत होता. मात्र, बुधवारी सरकारकडून लस प्राप्त न झाल्याने, आज महापालिकेच्या केंद्रांवर होणारे लसीकरण पूर्ण बंद राहणार,
– दरम्यान कमला नेहरू रुग्णालयात परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेकडील शिल्लक कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली जाणार,
– शहरातील प्रत्येक झोननिहाय एका रुग्णालयात व ससून रुग्णालयात आज कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मात्र उपलब्ध राहणार,
– ज्यांनी २ जूनपूर्वी पहिला डोस घेतला आहे अशांना ५० टक्के लस ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ५० टक्के लस ही ऑन दी स्पॉट उपलब्ध असेल.
– पहिला डोस कोविशिल्डचा तर दुसरा डोस कोव्हॅक्सिनचा
– एकाच महिलेला कोरोना लसीचे दोन वेगवेगळे डोस
– नागपूर मेडीकलमधील धक्कादायक प्रकार
– लसीकरण नोंदणीच्या वेळेस दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरमुळे झाली चूक
– तक्रार करणाऱ्या महिलेला दोन वेळा उलट्या झाल्याची माहिती
– प्रकृती स्थिर असल्याने तक्रारदार महिलेला घरी पाठवण्यात आलंय