Corona Update: सावधान…! आता मास्क घालाच ; ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव

| Updated on: Apr 26, 2022 | 3:34 PM

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याला पाच दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत पुन्हा दोन कोरोनाचे रुग्ण (Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंद जास्त काळ टिकवता आला नाही. गेल्या दोन दिवसांत सलग प्रत्येकी एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली असून जिल्ह्यात दोन रुग्णांची नोदं झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 20 एप्रिल आधीच्या 24 […]

Corona Update: सावधान...! आता मास्क घालाच ; या जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव
कोल्हापूरात कोरोनाचे रुग्ण
Image Credit source: TV9
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याला पाच दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत पुन्हा दोन कोरोनाचे रुग्ण (Corona) आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचा आनंद जास्त काळ टिकवता आला नाही. गेल्या दोन दिवसांत सलग प्रत्येकी एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली असून जिल्ह्यात दोन रुग्णांची नोदं झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 20 एप्रिल आधीच्या 24 तासांमध्ये एकाही नव्या कोरोना रुग्णांची नोंदग करण्यात आली नव्हती. जिल्ह्यात जे जुने कोरोनाच रुग्ण (patient) होते, ते सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाले होते, त्यामुळे कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या लाटेतून कोरोनामुक्त झाला होता.

गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या तीनही दिवशी एकाही कोरोना रुग्णाची नोंद केली गेली नव्हती. परंतु रविवारी आणि सोमवारी प्रत्येकी एक नागरिक कोरोनाग्रस्त आढळून आला असल्याने जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्णांची नोंद झाली आहे. एकीकडे दिल्लीतील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने दिल्लीत मास्क सक्ती केली गेली आहे. त्यामुळे आता नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले आहे.

रुग्णांची संख्या पुन्हा वाढली

सध्या देशामध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. गेल्या 24 तासामध्ये देशात कोरोनाचे 2541 नवे रुग्ण आढळले आहेत. सध्या देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 16,522 इतकी झाली आहे. तर देशात 30 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांकडे कोरोनाची चौथी लाट म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरत आहे.

कोरोनाबाबत इशारा

एकीकडे देशातील वेगवेगळ्या राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत, तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाबाबत इशारा दिला आहे. एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी मास्क वापरा, नियम पाळा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.