कोरोना पॉझिटिव्ह नवरदेव बोहल्यावर! लग्न लांबलं अन् सगळं उघडं पडलं, अख्खं वऱ्हाड क्वारंटाईन

| Updated on: May 06, 2021 | 7:44 PM

गुहागर तालुक्यातील शिरगावात चक्क कोरोना पॉझिटिव्ह नवरदेव बोहल्यावर चढला. महत्वाची बाब म्हणजे आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत, हे त्या नवरदेवाला माहिती होतं.

कोरोना पॉझिटिव्ह नवरदेव बोहल्यावर! लग्न लांबलं अन् सगळं उघडं पडलं, अख्खं वऱ्हाड क्वारंटाईन
नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह असूनही बोहल्यावर चढला
Follow us on

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारनं कडक लॉकडाऊन लागू केलाय. या काळात लग्नाला वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीसह वेळमर्यादाही घालून देण्यात आलीय. मात्र, रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गुहागर तालुक्यातील शिरगावात चक्क कोरोना पॉझिटिव्ह नवरदेव बोहल्यावर चढला. महत्वाची बाब म्हणजे आपण कोरोना पॉझिटिव्ह आहोत, हे त्या नवरदेवाला माहिती होतं. या प्रकरामुळे शिरगावसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (Corona Positive bridegroom stand for weeding in guhagar)

ग्राम कृती दलाच्या चौकशीत धक्कादायक बाबत समोर

सडेजांभारी गावातील मुलीचं लग्न शिरगावातील मुलाशी ठरलं. लॉकडाऊनच्या काळात लग्नासाठी संबंधित कुटुंबांनी 5 मे रोजी प्रांत कार्यालयातून रितसर परवानगी घेतली. 4 मे रोजी नवरा आणि नवरी दोन्ही बाजूकडील मंडळींची आबलोली इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करण्यात आली. त्याची एक प्रत शीरगाव ग्रामपंचायतीला मिळाली. त्यानुसार ग्राम कृती दलातील सदस्य वधूवराकडे गेले. त्यावेळी त्यांना कोरोना चाचणी अहवाल अद्याप आले नसल्याचं सांगण्यात आलं. मात्र, ग्राम कृती दलाने आरोग्य विभागाकडे चौकशी केल्यानंतर नवरदेवाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचं समजलं. माहिती मिळताच ग्राम कृती दलाचे सदस्य तातडीने विवाहस्थळी पोहोचले. नवरदेवाला जाब विचारला असता त्याने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं मान्य केलं. ही बाब लक्षात येताच वऱ्हाडी मंडळींच्या तोंडचं पाणी पळालं.

अख्खं वऱ्हाड होम क्वारंटाईन!

नवरदेवच कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे सर्व वऱ्हाडी मंडळींना गृह विलगीकरणात राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. इतकच नाही तर प्रांताच्या परवानगीचा भंग केल्या प्रकरणी आणि ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा विवाह सोहळा लांबल्या प्रकरणी ग्रामपंचायतीने नवरदेवाच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हे लग्न लावण्यासाठी आलेल्या पुरोहितालाही आता दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यास मज्जाव करण्यात आलाय.

राज्यातील कोरनोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं माहिती असतानाही नवरदेव थेट बोहल्यावर चढल्यामुळे गुहागर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर स्थानिक प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकलीय.

इतर बातम्या :

Shikhar Dhawan | ‘गब्बर’ धवनने घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, शिखरकडून ट्विटरवर फोटो शेअर

Corona Vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंची महापालिका आयुक्तांशी चर्चा

Corona Positive bridegroom stand for weeding in guhagar