Maharashtra Corona Update| राज्यात दिवसभरात 4161 रुग्णांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.64 टक्क्यांवर

राज्यात आज (24 जून) दिवसभरात 4 हजार 161 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे (Maharashtra corona recovery rate).

Maharashtra Corona Update| राज्यात दिवसभरात 4161 रुग्णांची कोरोनावर मात, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.64 टक्क्यांवर
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 12:00 AM

मुंबई : कोरोनाविरोधाच्या लढाईत सरकार, प्रशासन, डॉक्टर, नर्सेस आणि इतर यंत्रणा प्रचंड मेहनत घेत आहेत (Maharashtra corona recovery rate). त्यांच्या या मेहनतीला आता यश मिळताना दिसत आहे. राज्यात आज (24 जून) दिवसभरात 4 हजार 161 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 73 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 51.64 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली (Maharashtra corona recovery rate).

दिवसभरात तब्बल 3 हजार 890 नवे कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरी दुसरीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 3 हजार 890 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 900 वर पोहोचली आहे. यापैकी 73 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 62 हजार 354 रुग्णांवर उपचार सुरु आहे.

राज्यात दिवसभरात कुठे किती रुग्ण बरे झाले?

मुंबई मंडळ – 3530 रुग्ण (आतापर्यंत एकूण 51 हजार 737) पुणे मंडळ – 355 (आतापर्यंत एकूण 11 हजार 299) नाशिक मंडळ – 139 (आतापर्यंत एकूण 3652) औरंगाबाद मंडळ – 21 (आतापर्यंत एकूण 2562) कोल्हापूर मंडळ – 24 (आतापर्यंत एकूण 1383) लातूर मंडळ – 7 (आतापर्यंत एकूण 532) अकोला मंडळ – 26 (आतापर्यंत एकूण 1448) नागपूर मंडळ – 59 (आतापर्यंत एकूण 1179)

राज्यात 6 हजार 739 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू

राज्यात आज दिवसभरात 208 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 72 मृत्यू हे गेल्या 48 तासांमधील तर उर्वरित 136 मृत्यू हे दिवसभरातील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.72 टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 6 हजार 739 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

5 लाख 57 हजार 948 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 23 हजार 775 नमुन्यांपैकी 1 लाख 42 हजार 900 नमुने पॉझिटिव्ह (17.34 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 57 हजार 948 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 33 हजार 581 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची अद्यावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861
Non Stop LIVE Update
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.