AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळली, आता पुढे काय, भुजबळांनी सांगितला पुढचा पर्याय

हैदराबाद गॅझटच्या जीआरविरोधात मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, ही याचिका हाय कोर्टानं फेटाळली आहे, त्यानंतर आता भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

हैदराबाद गॅझेट विरोधातील याचिका न्यायालयानं फेटाळली, आता पुढे काय, भुजबळांनी सांगितला पुढचा पर्याय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2025 | 6:04 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे, या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईमध्ये आंदोलन केलं. दरम्यान मुंबईतील आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांची हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य केली आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जीआर देखील काढण्यात आला. दरम्यान त्यानंतर आता ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला आहे.

ओबीसी समाजाकडून हैदराबाद गॅझेटच्या जीआरला विरोध होत आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको, त्यांना स्वतंत्र्य आरक्षण देण्यात यावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ओबीसी विरूद्ध मराठा समाज असं चित्र निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढल्यानंतर त्याविरोधात हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ही जनहित याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे. विनीत धोत्रे यांनी या जीआरविरोधात मुंबई हाय कोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. ओबीसी संदर्भातील शासन निर्णयाने याचिकाकर्ते बाधित कसे झाले असा सवाल यावेळी हाय कोर्टाकडून उपस्थित करण्यात आला, मात्र ही याचिका जरी फेटाळून लावली असली तरी देखील याचिकाकर्त्यांना  रिट याचिका म्हणून सक्षम कोर्टासमोर दाद मागण्याची मुभा कोर्टानं दिली आहे.  आता यावर ओबीसी नेते छगन  भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ?  

आम्ही सांगितलं होतं जनहित याचिका नको, रिट याचिका करा,  आतापर्यंत आम्ही 4-5 रीट याचिका केल्या आहेत. असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की  जीआर मागे घ्या किंवा सुधारणा करा अशी आमची मागणी आहे. आम्हाला यश मिळेल अशी खात्री आहे.  आरक्षणाचा पाया आर्थिक विषयावर नाही, सामाजिक मागासलेपणावर आहे.  आमचीही लेकरंबाळंच आहेत,  ओबीसी जात नाही अनेक जातींचा समूह आहे, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता