Cute Video: सदावर्तेंना चिमुकलीने दिली सर्वांसमोर धमकी, राज ठाकरेंना म्हणाली I Love You
सध्या सर्वत्र एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ही चिमुकली थेट सदावर्तेंना धमकी देताना दिसत आहे. हा व्हिडीओ नक्की पाहा...

ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा आज वरळीत होत आहे. जवळपास 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत. या मेळाव्याला राज्यभरातून लाखो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. वरळी डोममध्ये या मेळाव्यासाठी तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमासाठी एक चिमुकली देखील उपस्थित आहे. एका चिमुकलीनं तर चक्क मराठमोठा साज करून शिवतीर्थावरुन गुणरत्न सदावर्ते यांना धमकी दिली आहे. तसेच राज ठाकरेंना I Love You असे म्हटले आहे.
चिमुकलीने दिली सदावर्तेंना धमकी
शिवतीर्थावर आलेल्या एका चिमुकलीने थेट गुणरत्न सदावर्तेंना धमकी दिली आहे. ती म्हणाली, “मी राज साहेबांना भेटायला चालले आहे. घरी भेटले तर तिथे, नाहीतर मेळाव्यात भेटणार आहे.” नववारी साडी नेसल्याचंही तिने बोबड्या शब्दात सांगितलं. यावेळी तिने राज ठाकरेंच्या विरोधात बोलणाऱ्या सदावर्तेंना सुनावलं, “ए सदावर्ते, BJP चा कु** ५ तारखेला भुभु कर, राज साहेब थँक्यू आय लव्ह यू!” तिच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हा संदेश ऐकून राज ठाकरेही नक्कीच खुश होतील.
Video: …तर मराठी लोकांचे चांगलेच हाल होतील; व्यापाऱ्यांच्या सभेत अमराठी महिलेची खुलेआम धमकी
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
चिमुकलीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने यावर कमेंट करत ‘जय महाराष्ट्र! महाराष्ट्राची रणरागिणी’ अशी कमेंट केली आहे. बाकी यूजर्सने या चिमुकलीचे कौतुक केले आहे.
केडियाला गुणरत्न सदावर्तेंचा पाठिंबा
त्रिभाषा धोरणावरून राज्यात बराच गदारोळ झाला होता. पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध झाला होता. मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एकत्र येऊन महामेळावा घेत आहेत. या मेळाव्यापूर्वी प्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना मराठीच्या मुद्द्यावरून डिवचलं होतं. त्यांनी ट्वीट केलं होतं, “तुम्ही ज्या पद्धतीने गैरवर्तन करता, त्यावरून तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी मिळत राहील. मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला?” या ट्विटमुळे बराच वाद निर्माण झाला होता. गुणरत्न सदावर्ते यांनी केडिया यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि व्हिडीओचं समर्थन केलं, ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला.