AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतकं तर करुच शकतो.. रस्ता, वेग आणि सीट बेल्टचं गणित समजून घेऊ

NCRB च्या आकड्यांनुसार, 2021 मध्ये देशरातील रस्ते अपघातात 1.55 लाख लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच दररोज सुमारे 426 मृत्यू. या आकड्यांवरून तरी आपण बोध घेतला पाहिजे. वाहतुकीचे नियम सुजाण होऊन पाळू शकतो.

इतकं तर करुच शकतो.. रस्ता, वेग आणि सीट बेल्टचं गणित समजून घेऊ
मागील सीटवर बसल्यानंतरही सीटबेल्ट वापरणे बंधनकारक आहे. Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Sep 09, 2022 | 9:55 AM
Share

मुंबईः टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेकांनी सीटबेल्ट (Seatbelt) बांधण्याचा धडा घेतलाय. अपघाताच्या (Road Accident) वेळी ते मागील सीटवर होते. सीटबेल्ट बांधला नव्हता. मागे बसल्यानंतरही सीटबेल्ट बांधणं आवश्यक असताना हा नियम सर्रास पाळला जात नाही. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर ही बाब अधोरेखित झाली. विविध संस्था यावर सखोल अभ्यास करत आहेत. सेव्हलाइफ फाउंडेशनच्या अभ्यासात मोठा निष्कर्ष समोर आलाय. मागे बसणारे 98.2% लोक सीट बेल्टचा वापर करतच नाहीत.

सर्वेक्षणानुसार, 77%  लोकांना मागे बसल्यानंतर सीटबेल्ट लावला नाही तरी पोलिसांनी रोखलेलं नाही. तर 37.8 % लोकांच्या मते, मागची म्हणजेच रीयर सीटवर बसल्यास बेल्ट बांधावा लागत नाही. 24% पालक मुलांना सीटबेल्ट बांधत नाहीत. सर्वेक्षणाच्या या आकड्यांवरूनच आपण किती निष्काळजी आहोत, हे दिसून येतं.

सीटबेल्टचं गणित काय?

  •  समजा कार 60 किमी वेगाने चालतेय. एखाद्या भिंतीवर ती आदळली तर ती काही सेकंद थांबते. पण कारमधील व्यक्ती, गोष्टींवर या वेगाचा परिणाम होतो. कारमधील गोष्टींचा वेगही शून्य होत नाही, तोपर्यंत परिणाम दिसतात. विंडशील्ड आणि डॅशबोर्डवर याचा परिणाम दिसतो.
  •  अपघात स्थितीत सीटबेल्ट हाच एकमेव उपाय आहे. बसलेल्या व्यक्तींना पुढच्या बाजूने ढकलणाऱ्या वेगाचा दबाव कमी केला जाऊ शकतो.
  •  सीटबेल्टमुळे शरीर मागील बाजूने रोखून ठेवण्यास मदत करतो. झटका लागला तरीही शरीराला पुढील बाजूने झुकण्यापासून रोखले जाते.
  • नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशनच्या अभ्यासानुसार, सीटबेल्टचा वापर केल्यास मृत्यूचा धोका 65 टक्के कमी होतो. तर चालकासमोरील एअरबॅगमुळे 8% धोका टळतो.
  • सीटबेल्ट लावला असेल आणि एअरबॅगही वेळेवर उघडली तर मृत्यूची शक्यता 68 टक्क्यांनी कमी होते.
  •  सेंट्रल मोटर्स व्हेइकल रुल्सनुसार, गाडी चालवताना ड्रायव्हर आणि इतर सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट लावणं बंधनकारक आहे. अन्यथा 1 हजार रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो.

सीटवबेल्ट लावणं का आवश्यक आहे?

  •  NCRB च्या आकड्यांनुसार, 2021 मध्ये देशरातील रस्ते अपघातात 1.55 लाख लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच दररोज सुमारे 426 मृत्यू.
  •  दुसऱ्या एका सर्वेक्षणानुसार, नियमानुसार सीटबेल्ट बांधला तर रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करता येते. – NCRB च्या आकड्यांवरून तरी आपण बोध घेतला पाहिजे. वाहतुकीचे नियम सुजाण होऊन पाळू शकतो.
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?