AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सबसे कातिल गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर…पहिले पोस्टर रिलिज…

gautami patil ghungroo movie | लावणी आणि सौंदर्यामुळे अल्पवधीतच प्रसिद्धीस आलेली नृत्यांगणा गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर येत आहे. गौतमी पाटील हिचा चित्रपट १५ डिसेंबरपासून राज्यात प्रदर्शित होत आहे. एकाचवेळी 100 चित्रपटगृहात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे निर्माते बाबा गायकवाड यांनी सांगितले.

सबसे कातिल गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर...पहिले पोस्टर रिलिज...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 02, 2023 | 1:18 PM
Share

सागर सुरवसे, सोलापूर, | 2 डिसेंबर 2023 : आपल्या अदाकारी आणि नृत्याने अनेकांना वेड लावणारी गौतमी पाटील आता रुपये पडद्यावर येत आहे. तिची लावणी आणि सौंदर्यामुळे तिच्या कार्यक्रमांना राज्यभरात मोठी मागणी असते. तिचे नृत्य अनेकांना घायाळ करणारे आहे. राज्यातील महानगरात नव्हे तर खेड्यापाड्यात तिचे कार्यक्रम हाऊसफुल्ल झाले आहेत. या कार्यक्रमांना गर्दीमुळे पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो. आता गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर येत आहे. तिचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गौतमी पाटील हिची प्रमुख भूमिका असलेल्या ‘घुंगुरु’ चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट येत्या 15 डिसेंबरला एकाच वेळेस 100 चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे निर्माते बाबा गायकवाड यांनी सांगितले.

चित्रपटची काय आहे कथा?

बाबा गायकवाड यांनी ‘घुंगुरु’ चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. चित्रपटाचे निर्मातेही तेच आहेत. ‘घुंगुरु’ चित्रपट 15 डिसेंबरपासून प्रदर्शित होणार असल्याची माहिती बाबा गायकवाड यांनी पंढरपूरमध्ये दिली. हा चित्रपट गौतमी पाटील हिच्या आयुष्यावर दाखवण्यात आला आहे. तिला जीवनात आलेला संघर्ष आणि मिळालेले यश चित्रपटातून दाखवले असल्याचे दिग्दर्शक बाबा गायकवाड यांनी सांगितले. एकंदरीत लोककलावंत आणि त्यांचा संघर्ष चित्रपटातून मांडण्यात आला आहे. या चित्रपटात सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

गौतमी स्वत: करणार प्रमोशन

गौतमी पाटील ही स्वत: चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. 10 डिसेंबरपासून त्यासाठी ती राज्यातील प्रमुख शहरात फिरणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेरही झाले. देशातील सात राज्यांत चित्रीकरण झाले आहे. तसेच मराठीसह इतर हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांतही चित्रपटाचे डबिंग करण्यात येणार आहे. गौतमी पाटील हिचा कार्यक्रमांनी युवकांना वेड लावले. युवतीसुद्धा तिच्या कार्यक्रमांना येत होत्या. आता चित्रपटासंदर्भात उत्सुक्ता निर्माण झाली आहे. गौतमी हिच्या कार्यक्रमांप्रमाणे चित्रपटही चाहत्यांना सिनेमागृहात आणणार का? हे १५ डिसेंबरपासूनच समजणार आहे.

Follow Us
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा