AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? अजितदादांच्या विधानाने चर्चेला उधाण!

अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठे भाष्य केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणार? अजितदादांच्या विधानाने चर्चेला उधाण!
ajit pawar
| Updated on: Sep 04, 2025 | 3:08 PM
Share

Ajit Pawar : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहे. लवकरच या निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांवर सत्ता यावी म्हणून सर्वच पक्षांनी कामाला सुरुवात केली आहे. स्थानिक पातळीवरील जनाधार असलेल्या नेत्यांना कशी ताकद पुरवता येईल, याचा विचार पक्षातील वरिष्ठांकडून केला जात आहे. दरम्यान, आता या निवडणुका दिवाळीनंतर लागणार असल्याचे सांगितले जात असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका पुन्हा लांबणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात….

अजित पवार एका कार्यक्रमात भाषण करत होते. या भाषणादरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर भाष्य केले. “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही,” असे भाष्य अजित पवार यांनी केले. तसेचपुन्हा मीच निवडणुका जानेवारी महिन्यात होतील, असा दावा केला जाईल, मला याबाबत ठोस कल्पना नाही, असेही यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.

निवडणुका लांबण्याचे कारण काय, मी…

अजित पवार यांनी यावेळी लांबत चाललेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरही भाष्य केले. निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे. 2017 सालानंतर 2022 साली निवडणुका होणे गरजेचे होते. मात्र नंतरची 2022, 2023, 2024 साल गेलं. आता 2025 हे वर्षही संपायची वेळ आली आहे. या निवडणुका लांबण्यामागे काय कारणं आहेत याच्या खोलात मी जात नाही, असे भाष्य अजित पवार यांनी केले. तसेच सर्व घटकांना प्रतिनिधित्त्व मिळायला हवे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आता अजित पवार यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत. काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत लांबल्या तर काय होईल? यात कोणकोणत्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असेल, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...