सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, अचानक बंद पडलं
एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाली आहे.

Eknath Shinde Helicopter Malfunction : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाली. पंढरपूरचा दौरा आटोपून ते मुंबईला निघाले होते. परंतु हेलिकॉप्टर सुरूच झाले नाही. हेलिपॅडवर अचानक हेलिकॉप्टर बंद पडले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आता रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे. हेलिकॉप्टर बंद पडले तेव्हा कोणतीही दुर्घटना घडलेली नाही.
नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे हे पंढरपूरमध्ये कार्यक्रम आटोपून निघाले होते. ते हेलिपॅडवर पोहचून ते हेलिकॉप्टरमध्येही बसले होते. परंतु हेलिकॉप्टर सुरू झाले नाही. मिळालेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरच्या बॅटरीत तांत्रिक बिघाड झाला. ऐनवेळी हेलिकॉप्टर बंद पडल्याने अधिकाऱ्यांची धावपळ झाली. हेलिपॅडवर लगेच पोलीस, सुरक्षा अधिकारी दाखल झाले. सोलापूरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार ते पंढरपूरहून आता पुण्याला निघाले आहेत. ते पुण्याहून विमान प्रवास सरून मुंबईला जाणार आहेत.
एक इंजिन सुरू झाले, दुसरे इंजिन मात्र…
एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरमध्ये बसले होते. पायलट हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ते सुरू होत नव्हते. एक इंजिन सुरू झाले होते. परंतु दुसरे इंजिन सुरू होत नव्हते. बॅटरी लो असल्यानेच ही अडचण निर्माण झाली. बॅटरी चार्ज करण्याचा प्रयत्न झाला. परंतु यात यश आले नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना साधारण वीस ते 25 मिनिटे वाट पाहावी लागली. त्यानंतर ते कारमधून पुण्याच्या दिशेने निघाले. पुण्याहून आता ते मुंबईला विमानाने जाणार आहेत.
हेलिकॉप्टरची तपासणी केली नव्हती का?
एकनाथ शिंदे ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते त्याल दोन इंजिन होते. यातील एक इंजिन सुरूच झाले नाही. कोणताही धोका न पत्करता नंतर एकनाथ शिंदे यांनी कारमधून प्रवास करण्याचे ठरवले. ते रस्त्याने पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. परंतु संबंधित हेलिकॉप्टरची चाचणी झाली नव्हती का? हेलिकॉप्टरचे सर्व भाग दुरुस्त आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली होती का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.