गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त; अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ई पासबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय 

| Updated on: Sep 10, 2022 | 9:25 AM

देशभरातील अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे.

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त; अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ई पासबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय 
Follow us on

कोल्हापूर : देशभरातील अंबाबाईच्या (Ambabai) भक्तांसाठी (devotee) आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही (Navratri Festival) निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे. नवरात्र उत्सव काळात करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांवर कोणतेही निर्बंध नसरणार आहेत. निर्बंधमुक्त वातावरणात यंदाचा नवरात्रोत्सव पार पडणार आहे. गेले दोन वर्ष राज्यावर कोरोनाचे संकट हेते. कोरोना काळात अनेक निर्बंध लावण्यात आले. निर्बंधांचा परिणाम हा नवरात्र उत्सवावर देखील झाला. मात्र यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने निर्बंधमुक्त वातावरणातल नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

पासची सक्ती नाही

दोन वर्षानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा झाल्याने भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. आता गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावणात पार पडणार आहे. कोरोना काळात ई पास भक्तांसाठी सक्तीचा करण्यात आला होता. मात्र यंदा मंदिर प्रशासनाकडून ई पासबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ई पासची आवश्यकता नसणार आहे. ई पासची सक्ती उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

तयारीला सुरुवात

महाराष्ट्रात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. नवरात्रोत्सवाला करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. गेले दोन वर्ष राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने या गर्दीला ब्रेक लागला होता. मात्र यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने भाविक दर्शनाला गर्दी करण्याची शक्यता आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाच्या वतीने तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव देखील निर्बंधमुक्त वातावरणाल साजरा होणार असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.