डॉ. घैसास यांचा राजीनामा, कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग सुरू, दीनानाथ रुग्णालयानं धोरणात काय बदल केला?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉ. घैसास यांनी शेवटी राजीनामा दिला आहे. त्यानंतर रुग्णालयच्या प्रशासाने अधिकृत भूमिका मांडली आहे.

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने हलगर्जीपणा दाखवल्यामुळे तसेच अनामत रुक्कम म्हणून 10 लाख रुपयांची मागणी केल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. मात्र फक्त राजीनामा देऊन काय होणार? महिलेच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. असे असतानाच आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत रुग्णालयात या प्रकरणात आतापर्यंत काय-काय कारवाई केली आहे, याबाबत माहिती दिली आहे. तसेच डॉ. कैसास यांच्या राजीनाम्यावरही त्यांनी रुग्णालयाची भूमिका सांगितली आहे.
डॉ. घैसास यांच्या राजीनाम्यात नेमकं काय?
महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या डॉ. सुश्रुत घैसास हे आमच्याकचे मानद प्रसुती व स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. ते आमच्या रुग्णालयाचे कर्मचारी नाहीयेत. गेली दहा वर्षांपासून ते आमच्याकडे काम करतात. त्यांनी आज आमच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. गेल्या काही दिवसांतील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत, असे त्यांनी आपल्या राजीनाम्यात नमूद केले आहे. धमक्यांचे फोन, समाजमाध्यमांवर होणारी कठोर टीका तसेच तणावाचे वातावरण असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांच्या आताच्या रुग्णांच्या उपचारावर परिणाम होईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा, कुटुंबाच्या सुरक्षेच्या तसेच हिताच्या दृष्टीने त्यांनी राजीनामा दिला आहे.
गुरुवारपासून डॉ. घैसास पदावरून मुक्त
डॉ. घैसास यांच्या देखरेखीखाली आता असलेल्या रुग्णांची दोन ते तीन दिवसांत पर्यायी व्यवस्था होईल. तोपर्यंत तेवढे दोन-तीन दिवस त्यांचं आहे ते काम संपवतील आणि गुरुवारपासून आपल्या पदापासून मुक्त होतील, अशी माहिती डॉ. केळकर यांनी दिली.
रुग्णालय प्रशासन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार
तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अनामत रक्कम घेण्याची पद्धत कधीच नव्हती. खोट्या रकमांसाठी म्हणजेच 5 ते 10 रुपयांच्या खर्चासाठी ही पद्धत होती. ती आपण काढून टाकली आहे. आमच्या रुग्णालयच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. त्यामुळे काम करताना बोलण्या-वागण्यामध्ये संवेदनशीलता पाहिजे, माधुर्य पाहिजे ती कधी-कधी कमी होते. ती सुधारण्यासाठी आम्ही प्रशिक्षण चालू केले आहे, अशी माहितीही डॉ. केळकर यांनी दिली आहे.
