AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईश्वरी भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या, सरकारने थोडी…गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक!

दीनानाथ रुग्णालयातील गर्भवती महिलेचे मृत्यूप्रकरण चांगलेच गाजले आहे. या प्रकरणी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर गंभीर स्वरुपाची टीका केली आहे.

ईश्वरी भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या, सरकारने थोडी...गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक!
supriya sule
| Updated on: Apr 07, 2025 | 7:46 PM
Share

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले आहे. या मृत्यूप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, तसेच या मृत्यूमध्ये ज्या डॉक्टरांचा तसेच अन्य लोकांचा समावेश आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर या रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. असे असताना राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीदेखील ईश्वरी भिसे या महिलेचा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे, असे म्हणत या प्रकरणातील डॉक्टरांवर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणावर बोलताना राज्य सरकारवरही टीका केली आहे.

आम्हाला राजीनामा नकोय, तातडीने गुन्हा दाखल करा

ईश्वरी भिसे या महिलेच्या प्रसूतीसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने अगोदर 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. याच महिलेला नंतर अन्य रुग्णालयात रेफर करण्यात आले होते. मात्र प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणा बोलताना “ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झालेला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. डॉ. घैसास यांनीर राजीनामा दिला म्हणजे काय झालं? आम्हाला राजीनामा नकोय. आम्हाला सरकारकडून तातडीने कारवाई हवी आहे. या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आलेला आहे. या अहवालातून रुग्णालय प्रशासनाची चूक आहे, हे दिसत आहे. त्यामुळेच या प्रकरणात समावेश असलेल्या सर्वावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का? असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

कुठल्याही लेकीवर अन्याय होऊ नये म्हणून मी आले

“मृत महिलेने ज्या मुलींना जन्म दिलाय, त्या मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. त्या मुलींवर आयसीयूमध्ये उपचार चालू आहे. त्या महिलेचे कुटुंब वेगळ्या दु:खातून जात आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवावी. त्या मुलीची जी हत्या झाली, तसा दिवस महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर येऊ नये त्यासाठी मी इथे आली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही तसेच इतर गोष्टी पारदर्शकपणे संपूर्ण महाराष्ट्राला समजल्या पाहिजेत. त्या दिशवी नेमकं काय झालं, ते समोर आलं पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

एका ठराविक काळात या प्रकरणाचा तपास करावा- सुळे

तसेच, या प्रकरणात समाविष्ट असलेले डॉक्टर, तसेच महिलेच्या हत्येत जे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समविष्ट आहेत, त्या सर्वांनाच शिक्षा झाली पाहिजे. विशेष म्हणजे ही कारवाई एका निश्चित काळात झाली पाहिजे, असंही सुळे यांनी म्हटलंय.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.