‘त्या’ कारणांमुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय रखडला, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्या बैठकीतील या 5 मुद्द्यांनी वाढवले टेन्शन

Delhi Amit Shah and Vinod Tawde Meeting : मुख्यमंत्रीपदाचा निर्णय 'त्या' कारणांमुळे रखडला असल्याची माहिती आहे, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. या 5 मुद्द्यांनी टेन्शन वाढवलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

त्या कारणांमुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय रखडला, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्या बैठकीतील या 5 मुद्द्यांनी वाढवले टेन्शन
अमित शाह, विनोद तावडे
Image Credit source: Facebook
| Updated on: Nov 28, 2024 | 10:18 AM

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. अशातच भाजपचे नेते विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत ‘महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा’ या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. मराठा मुख्यमंत्री द्यायचा का? यावरून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय रखडला आहे का? असा प्रश्न आहे. कारण राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? यावर अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांनी आंदोलन उभारल्यानंतर एकवटलेला मराठा समाज, याचा राज्याच्या मुख्यमंत्री निवडीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण असणार? हे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची पसंती असली तर अमित शाह आणि विनोद तावडे यांच्या बैठकीत मात्र मराठा मुख्यमंत्री द्यायचा की नाही? यावर चर्चा झाली आहे. त्यामुळे राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

  1. विनोद तावडे आणि शाह यांच्या बैठकीत मराठा समीकरणावर चर्चा झाली आहे. ‘महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा’ या समीकरणावर चर्चा झाली आहे. अमित शाहांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्राच्या मराठा समाजाची समीकरणं समजून घेतली
  2.  देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मतांवर काही फरक पडेल का? किंवा ती कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
  3. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीजवजाबाकी करण्यात आली. मराठा चेह-याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची केंद्रीय नेतृत्वाला चिंता आहे.
  4. मराठा समाज आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाहांनी आढावा घेतला. भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच २०१४ ते २०२४ पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा घेतला आढावा.
  5. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे याबाबत सर्व गणितांची मांडणी केली. आगामी निवडणुका, फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीच्या मतांबाबतही चर्चा केली.