AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी, राष्ट्रवादीच्या नेत्याची पहिली मोठी प्रतिक्रिया, मुंबईहून..

Ajit Pawar plane accident : बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आहे. अजित पवार या विमान अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या स्थळाची धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाली आहेत.

अजित पवार विमान अपघातात गंभीर जखमी, राष्ट्रवादीच्या नेत्याची पहिली मोठी प्रतिक्रिया, मुंबईहून..
Ajit Pawar
| Updated on: Jan 28, 2026 | 9:41 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. मुंबईहून बारामतीला जात असताना हा अपघात झाला. लॅंडिंग करताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार यांच्यासोबत काहीजण या विमानात असल्याची माहिती मिळत आहे. लॅंडिंगदरम्यान हे विमान शेतात कोसळले. घटनास्थळाचे फोटो बघता विमानातून धूर निघत आहे. हे छोटे किमान असून अजित पवार कायमच या विमानाने प्रवास करत. जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीदरम्यान गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांचे दाैरे सुरू होते. आज सकाळी बारामतीमध्ये अजित पवारांची सभा होती. मात्र, बारामतीमध्ये पोहोचण्यापूर्वीच हा विमान अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. सध्या विमानाची आग विझवण्याचे काम सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील यांनी म्हटले की, आम्हाला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. सुदैवाने कोणालाही मोठी हानी झाली नसल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या बाबतीची माहिती आम्ही घेऊ या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांची धावपळ सुरू आहे. असं कळत आहे की, लॅंडिंगच्या वेळी काहीतरी बिघाड होऊन हा अपघात झाला आहे. चार ते पाच जण जखमी असल्याचीही माहिती मिळत असल्याचे रूपाली पाटील यांनी म्हटले.

अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची काही व्हिडीओ पुढे आली असून विमान जळून खाक झाले आहेत. या विमानात प्रवास करणारे काहीजण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. फोटो आणि व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे की, हा अपघात मोठा आहे. अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. या अपघाताची धक्कादायक अशी फोटो पुढे येत होते.

बारामती विमानतळावर लॅंडिंग होत असताना हा अपघात झाला. अजित पवार यांचे काही पीए आणि बॉडीगार्ड या विमानात होते अशी माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच अजित पवार यांचे निकटवर्तीय बारामती विमानतळाकडे जमत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. अजित पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना