मोठी बातमी ! ऐन निवडणुकीत अजित पवारांना लागली लॉटरी, राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग
Ajit Pawar NCP : पुण्यात अजित पवार यांची ताकद वाढली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यात सध्या महानगर पालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. उद्यापासून प्रचाराला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळाले. अनेक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. अशातच आता पुण्यात अजित पवार यांची ताकद वाढली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाला बळकटी मिळाली आहे. कोणत्या नेत्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला ते जाणून घेऊयात.
राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग
आज पुणे येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आयाज बदरुद्दीन काझी, माजी नगरसेविका बतुल आयाज काझी, संजू अशोक धोत्रे, राहुल अशोक धोत्रे, ॲड. सुकेश पासलकर, गौरी संजय करंजकर, आबा सुतार, शिवम आबा सुतार, सौ. प्रज्ञा विलास कामठे-मगर आदी मान्यवरांसह विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवार यांनी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आज पुणे येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पुणे मनपाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष आयाज बदरुद्दीन काझी, माजी नगरसेविका बतुल आयाज काझी, श्री. संजू अशोक धोत्रे, श्री. राहुल अशोक धोत्रे, ॲड. सुकेश पासलकर, श्रीमती गौरी… pic.twitter.com/cQyTJ2qr6x
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) January 2, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयातही पक्षात जोरदार इनकमिंग पहायला मिळाली आहे. पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि मुस्लिम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष ॲड. अयुब इलाही बक्ष शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी विचारांवर विश्वास ठेवत पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीत पक्षाची ताकद वाढली आहे. याचा चांगला फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता आहे.
उद्यापासून प्रचाराला सुरुवात
दरम्यान, 3 जानेवारीला महापालिका निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा यादी अंतिम यादी जाहीर होणार असून उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर प्रचाराला सुरुवात होणार आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीप्रमाणे राज्यातील बडे नेते यावेळीही जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि इतर नेते पायाला भिंगली लावून प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह अनेक नेते प्रचाराला महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
