AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काही जण माझ्या नावानं बोंबाबोम करत होते पण…, मलिकांनी भाजपला डिवचलं, जोरदार हल्लाबोल

राष्ट्रवादी अजित पवार गटानं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानंतर आता या सर्व पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांची पत्रकार परिषद पार पडली.

काही जण माझ्या नावानं बोंबाबोम करत होते पण..., मलिकांनी भाजपला डिवचलं, जोरदार हल्लाबोल
नवाब मलिक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 02, 2026 | 4:50 PM
Share

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत यावेळी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण यावेळी मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती झाली आहे. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटानं ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती या निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे, तर दुसरीकडे या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आल्यानं भाजप आणि शिवसेना शिंदे गटापुढे मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल आता काय लागणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान ही निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गटानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.  भाजपकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्या नावाला विरोध करण्यात आला होता. जर मलिक असतील तर युती होणार नाही असं भाजपच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं होतं, त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटानं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज मुंबईमध्ये नवाब मलिक यांची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले मलिक?  

नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही जण माझ्या नावाने बोंबाबोम करत होते. मी असेल तर युती होणार नाही, असं काही जणांनी म्हटलं होतं. पण अजित पवार हे माझ्या पाठीशी उभे राहिले. अजित पवार यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय योग्य आहे, असं यावेळी नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.
BMC निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी?
BMC निवडणुकीसाठी शिंदे सेनेची अधिकृत उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी?.
फक्त 2 ओळी अन् मनसेचा राजीनामा..11 पदाधिकाऱ्यांनी राज यांची सोडली साथ
फक्त 2 ओळी अन् मनसेचा राजीनामा..11 पदाधिकाऱ्यांनी राज यांची सोडली साथ.
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड
मयत झालेल्यांवर निवडणुकीची जबाबदारी...संभाजीनगर प्रशासनाचा कारभार उघड.
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा
भाजपच्या पूजा मोरेंची उमेदवारी, जुन्या व्हिडीओवरून जरांगेंचा थेट इशारा.
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?
पुण्यात सत्तेचा सारीपाट, कोण मारणार बाजी? नागरिकांच्या भावना काय ?.
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन
अपक्ष उमेदवारालाच लोकांनी घरातच कोंडलं, BJP नं दिलेला AB फॉर्म रद्द अन.