दिल्लीत घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, महाराष्ट्रात टेन्शन वाढल..
Eknath Shinde Amit Shah : राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी वाढली आहे. त्यातच आता राजकीय घडामोडींना वेग आला असून एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर जाणार आहेत.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण दौऱ्यादरम्यान एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून नाराजीनाट्य बघायला मिळतंय. राज्यात विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर झाली आहे. त्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच अमित शहा मुंबई दाैऱ्यावर आले होते. अमित शाह यांच्यासोबत प्रवास करतानाही एकनाथ शिंदे दिसले होते. त्यांनी अमित शहा यांची भेटही घेतली होती. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर गेले होते.
एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दाैऱ्यावर जाणार असल्याने विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. राज्यातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या 5 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी वाढली आहे. बंडखोरांचा बंड शांत करण्याचे मोठे आव्हान आहे. काही जागांवरून वाद वाढताना दिसतोय. यासर्व राजकीय घडामोडींमध्ये थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर जाणार आहेत.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आज किंवा उद्या दिल्ली दाैऱ्यावर जाऊ शकतात. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन जागावाटपावर थेट चर्चा करण्याची शक्यता आहे. पुण्यातील जागेवरून वाद बघायला मिळतोय. सध्या महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा वाद दिसतोय. भाजपाकडे गेलेल्या जागांवर एकनाथ शिंदे दावा करताना दिसत आहेत.
हेच नाही तर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्तेही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे दिल्लीच्या दाैऱ्यावर जाणार आहेत. सर्व गोष्टींवर शिंदे आता अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतील. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यातील जवळीकता वाढली आहे. एकनाथ शिंदे कायमच दिल्ली दाैऱ्यावर गेल्यानंतर अमित शहा यांची भेट घेतात म्हणजे घेतातच.