AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन, अपघात नेमका कुठे आणि कसा झाला?

बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. लँडिंग दरम्यान विमान शेतात कोसळून लागलेल्या आगीत अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वाचा अपघाताचे सविस्तर कारण आणि घटनाक्रम.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन, अपघात नेमका कुठे आणि कसा झाला?
ajit pawar 1
| Updated on: Jan 28, 2026 | 10:11 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला सकाळी बारामतीमध्ये भीषण अपघात झाला. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असताना विमान शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या हृदयद्रावक दुर्घटनेत अजित पवारांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ६ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिली आहे.

नेमका अपघात कुठे आणि कसा झाला?

अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले. ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. अजित पवार आज बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार महत्त्वाच्या सभांना संबोधित करणार होते, मात्र त्यापूर्वीच हा भीषण अपघात झाला.

राजकीय वर्तुळात मोठी शोककळा

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडून (DGCA) या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे.

अजित पवार आज बारामती तालुक्यात चार वेगवेगळ्या प्रचार सभांना संबोधित करणार होते. त्यांच्या सभेसाठी सकाळपासूनच कार्यकर्ते विमानतळाच्या परिसरात आणि सभास्थळी मोठ्या संख्येने जमले होते. मात्र, अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बारामतीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे.

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?