AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | ‘एवढं लक्षात ठेवा…’, अजित पवारांनी भर विधानसभेत ऐकवली कविता

गेल्या काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO | 'एवढं लक्षात ठेवा...', अजित पवारांनी भर विधानसभेत ऐकवली कविता
अजित पवार
| Updated on: Jul 05, 2024 | 4:39 PM
Share

Ajit Pawar Maharashtra Assembly Poem : सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा 8 वा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विधानसभेतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते एक कविता बोलताना दिसत आहेत.

अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी लेखक आणि कवी विं.दा.करंदीकर यांची एक कविता सभागृहात ऐकवली. ही कविता सांगण्यापूर्वी त्यांनी विरोधकांकडे हात दाखवत त्याचे शीर्षक सांगितले. एवढं लक्षात ठेवा, असे या कवितेचे शीर्षक आहे.

अजित पवारांनी सभागृहात ऐकवलेली कविता

उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा । श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥

ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी । ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा ।।

जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा । मात्र तीही माणसे; एवढे लक्षात ठेवा ॥

चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता । उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥

विश्वास ठेवावाच लागे, व्यवहार चाले त्यावरी । सीमा तयाला पाहिजे; एवढे लक्षात ठेवा ॥

दुप्पटीने देतसे जो, ज्ञान आपण घेतलेले । तो गुरूचे पांग फेडी; एवढे लक्षात ठेवा ॥

माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी । त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥

अजित पवारांची ही कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अजित पवार ही कविता ऐकवताना सतत विरोधकांकडे बघून मिश्किल हसत असल्याचेही दिसत आहे. तर अजित पवारांच्या या कवितेवर सत्ताधारी पक्षातील नेते हे बाक वाजवत असल्याचे दिसत आहे.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.