AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडीत हाहाकार! अमेरिकेच्या मोहिमेने जगाची उडाली झोप, थेट खाडीतच..

इराण आणि अमेरिका युद्धाला आता पाच दिवसांनी एक महिना पूर्ण होईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध थांबण्याचे संकेत अजिबात नाहीत. त्यामध्येच आता अमेरिका इराणला दणका देण्याचा तयारीत आहे. अमेरिकेकडून मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

होर्मुज खाडीत हाहाकार! अमेरिकेच्या मोहिमेने जगाची उडाली झोप, थेट खाडीतच..
Gulf of Hormuz
| Updated on: Mar 23, 2026 | 8:43 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून युद्ध अधिक पेटल्याचे बघायला मिळत आहे. मोठे घातक हल्ले केले जात आहेत. मात्र, अमेरिकेची मोठी नाचक्की या युद्धात झाली. इराणकडून होर्मुज मार्ग बंद करण्यात आला. होर्मुज खाडी सुरू करण्यासाठी अमेरिकेने ना ना प्रयत्न केले पण त्यांना अजिबातच यश मिळत नाही. फान्स, चीन, दक्षिण कोरिया यासारख्या देशांना अमेरिकेने युद्धनाैका पाठवण्यास सांगितले होते. मात्र, एकही देश अमेरिकेच्या मदतीकरिता पुढे आला नाही. अमेरिका या युद्धात एकटी पडली आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने आखाती देश अमेरिकेवर नाराज आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात यावी अशी मागणी केली जात आहेत. यासोबतच जागतिक बाजारात तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. तेलाच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्याकरिता अमेरिकेने थेट रशियाचे तेल खरेदी करण्याचे आवाहन केले.

होर्मुज खाडी सुरक्षित करण्यात यावी, याकरिता अमेरिकेकडून इराणला 48 तासांचा वेळ देण्यात आला. मात्र, त्यानंतर इराणकडूनही अमेरिकेला मोठी धमकी देण्यात आली. अनेक प्रयत्न करूनही होर्मुज खाडी सुरक्षित होत नसल्याने आणि जगातील अनेक देशांचे तेलवाहू आणि मालवाहू जहाज तिथे अडकल्याने अमेरिकेवरील दबाव चांगलाच वाढला आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता मास्टर प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती मिळतंय.

होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता मोठा हल्ला अमेरिका करू शकते असे सांगितले जात आहे. होर्मुज खाडी पार करायची असेल तर मोठे पैसे आता मोजावे लागणार आहेत. इराणकडून जहाजांकडून मोठा पैसा होर्मुज खाडीत घेतला जात आहे, हाच पैसा युद्धासाठी वापरणार असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यानच इस्रायली संरक्षण दलाने इराणमधील हवाई हल्ल्यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. ज्या लक्ष्यांवर हल्ला करण्यात आला, ते दिसत आहे.

होर्मुज खाडीतून इराण पैसा कमावत आहे. त्यामुळे इराणला थेट युद्धासाठी पैसा मिळणार असल्याने युद्ध अधिक काळ सुरू राहू शकते. मात्र, अमेरिकेला होऊ द्यायचे नाही. कोणत्याही क्षणी अमेरिकेकडून मोठा हल्ला होर्मुज खाडीवर केला जाऊ शकतो. अमेरिकेकडून हल्ल्याचा पूर्ण प्लॅन तयार असल्याचे सांगितले जात आहे. होर्मुज खाडी सुरक्षित करण्याकरिता यावेळी तरी अमेरिका यश मिळते का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल