विरोधकांचे कोण-कोण जायचे ? खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
नाशिकच्या अशोक खरात प्रकरणात विरोधकांनी राजकारण करु नये. विरोधकांचे कोण जायचे याची माहिती आहे, आमच्याकडे, धरणाचे पाणी देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने कॅबिनेट बैठकीत घेतला होता. याचीही चौकशी करु असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नाशिकचे अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात अनेक महिलांवर अत्याचार झाला आहे. लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे अशा प्रकरणात महिला तक्रार करायला पुढे येत नाहीत. त्यांना धीर देऊन त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्या तक्रारी आधारे गुन्हे दाखल झालेले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड आम्हीच केलेला आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. कोणाकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पुढे येऊन द्यावेत. परंतू उगाच राजकीय रंग देण्याचे काम करु नये. आता विरोधी पक्षाचे कोण-कोण येथे जायचे याचे पुरावे आमच्याकडे आहेत. म्हणजे पोलिस त्यावर काम करतच आहेत. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. कॅप्टन खरात अध्यक्ष असलेल्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान साठी दारणा धरणातून पाणी आरक्षित कसे गेले. 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्याची मंजुरी महाविकास आघाडी सरकारने कॅबिटने मिटींगमध्ये कशी घेतली याची चौकशी करता येईल. 31 जुलै 2020 रोजी यासाठीचा शासन निर्णय काढण्यात आला होता.त्यामुळे विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिला. आपल्या तथाकथित शक्तीचा वापर करुन महिलाचं शोषण करणाऱ्याचा तपास आम्ही करत आहोत. त्यामुळे आम्ही कोणालाही सोडणार नाही असाही इशारा फडणवीस यांनी विरोधकांनाही दिला आहे.
Published on: Mar 22, 2026 12:44 PM
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

