भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कशी झाली? न्यायाधीशांनी सगळ्या सुट्ट्या…फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट!

केवळ 29 दिवसात 55 साक्षीदार तपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन फाशीची शिक्षा झालेली आहे. मी न्यायालयाचे विशेष आभार मानतो. कारण आरोपपत्र दाखल करण्यापर्यंत प्रकरण पोलिसांच्या हातात असते. त्यानंतर संबंधित प्रकरण हे न्यायालयाच्या हातात असते. म्हणूनच मी न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांचे मी विशेष आभार मानतो, असे फडणवीस म्हणाले.

भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा कशी झाली? न्यायाधीशांनी सगळ्या सुट्ट्या...फडणवीसांनी सांगितली पडद्यामागची गोष्ट!
devendra fadnavis and bhimrao kamble
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 29, 2026 | 4:28 PM

Bhimrao Kamble : भोर तालुक्यातील नरसापूर येथे तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. याआधी 26 जून रोजी न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, भीमराव कांबळेला दोषी ठरवल्यानंर सर्वत्र समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पावसाळी अधिवेशनात या निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे. अतिशय कमी कालावधीत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. पुरावे गोळा केले. न्यायालयानेही सलग सुनावणी घेऊन निकाल दिला, असे म्हणत फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.

 

केवळ 14 दिवसांमध्ये 16 मे 2026 रोजी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं. 28 मे 2026 रोजी या न्यायालयासमोर आरोप निश्चिती झाली. 26 मे 2026 रोजी पहिली साक्ष नोंदवण्यात आली. केवळ 16 दिवसात 55 साक्षीदारांची तपासणी, उलटतपासणी करण्यात आली. त्यानंतर 25 जून 2026 रोजी न्यायालयाने सदर आरोपीला दोषी म्हणून जाहीर केलं. म्हणजेच जवळपास घटना घडल्यानंतर 55 व्या दिवशी आरोपीला दोषी ठरवलं. त्यानंतर 29 जून रोजी आरोपीला तिहेरी फाशीची शिक्षा न्यायालयाने दिलेली आहे, असे फडणवीस विधिमंडळात म्हणाले.

केवळ 29 दिवसात 55 साक्षीदार तपासून सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन फाशीची शिक्षा झालेली आहे. मी न्यायालयाचे विशेष आभार मानतो. कारण आरोपपत्र दाखल करण्यापर्यंत प्रकरण पोलिसांच्या हातात असते. त्यानंतर संबंधित प्रकरण हे न्यायालयाच्या हातात असते. म्हणूनच मी न्यायमूर्ती एस आर साळुंखे यांचे मी विशेष आभार मानतो. कारण या प्रकरणाची सलग सुनावणी घेण्यासाठी त्यांनी त्यांच्या सुट्ट्यादेखील रद्द केल्या, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

तसेच, पुढे बोलताना अशा प्रकारच्या नराधमांवर आपल्याला कारवाई करायची असेल. जरब बसवायची असेल तर वेळेत न्याय मिळणं गरजेचं आहे. न्यायालयाने या प्रकरणात एक नवं उदाहरण मांडलं आहे. या प्रकरणावर काम करणारे एसपी संदीपसिंग गील, त्यांच्या नेतृत्त्वात काम करणारे इतर अधिकारी यांचे मी अभिनंदन करतो. कारण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पुरावे गोळा केले. सर्व पुरावे ग्राह्य धरण्यात आले, असे म्हणत त्यांनी न्यायसंस्था, पोलीस यंत्रणा यांचेही आभार मानले.

Follow Us