देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा नावामुळे शाळा सोडली होती, काय आहे बालपणाचा किस्सा ?

देवेंद्र फडणवीस यांच्या वर्ग शिक्षिका सावित्री अय्यर यांनी सांगितले की आपण त्याला हिंदी शिकवित होतो. तो सर्वसाधारण विद्यार्थी होता. आताही देवेंद्र त्यांना भेटल्यावर त्यांच्या पाया पडतात. ते स्वभावाने अत्यंत नम्र होते. आपल्या कामाशी काम ठेवणारे होते. त्यांना विविध विषय शिकविणारे शिक्षकांना देखील देवेंद्र यांच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती.

देवेंद्र फडणवीस यांनी इंदिरा नावामुळे शाळा सोडली होती, काय आहे बालपणाचा किस्सा ?
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 10:27 PM

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांनी आपला प्रवास नागपूरचे नगरसेवक ते महापौर म्हणून सुरु केला होता. २२ जुलै १९७० मध्ये नागपूरात जन्मलेले देवेंद्र फडणवीस यांना २२ व्या वर्षी साल १९९२ मध्ये राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण नागपूरात झाले होते.नागपूरातील शंकर नगर स्थित सरस्वती विद्यालयात त्यांचे दुसऱ्या इयत्तेपासून प्राथमिक शिक्षण सुरु झाले. त्याआधी नागपूरच्या इंदिरा गांधी कॉन्व्हेट शाळेत त्यांना घातले होते. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ मध्ये इमर्जन्सी लागू केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधर फडणवीस यांना तुरुंगात टाकले होते. त्यामुळे त्यांच्या मनात इंदिरा गांधी यांच्याबद्दल चीड होती. फडणवीस यांनी इंदिरा कॉन्व्हेंटमधून आपले नाव काढायला भाग पाडले आणि सरस्वती शाळेत प्रवेश घेतला.

फडणवीस यांचे बालपणीचे मित्र डॉ. निशित विजय, विवेक मिश्रा, मुकुल बरानपुरे यांनी सांगितले की अभ्यासात देवेंद्र सर्वसाधारण विद्यार्थी होते. शाळेपासून एक किलोमीटरवर त्यांचे घर होते. कधी सायकलवरुन तर कधी ते पायी शाळेत जात. ते वर्गात पाठच्या बाकावर बसायचे. त्यांची वर्गमित्रांशी घट्ट मैत्री होती. त्यामुळे मित्रांच्या चुकीमुळे त्यांनाही मार बसायचा असे त्याचे मित्र सांगायचे.  फडणवीस यांच्या मित्रांनी सांगितले की एकदा त्यांच्या मित्रांनी मिळून गॅदरींगमध्ये कॉलेजच्या बाथरुममध्ये सुतळी बॉम्ब फोडले होते. त्यामुळे त्यांना शिक्षा देखील झाली होती. फडणवीस यांना समोसे खूप आवडायचे. एक रुपये पॉकेटमनी मिळायचा. त्यातून ते ५० पैशांचा समोसा खायचे. शाळेच्या शेजारील प्रिती कॉर्नर येथे ते समोसा खायचे. आजही तेथील समोसे खूप प्रसिद्ध आहेत. फडणवीस यांचा स्टाफ येथील समोसे आजही पॅक करुन त्यांच्यासाठी नेतात असे त्यांचे वर्गमित्र सांगतात.

देवेंद्र यांच्याबद्दल शिक्षकांची तक्रारच नाही

देवेंद्र फडणवीस यांचे वडील आमदार होते. परंतू ते एकदम सरळ आणि साधे होते,त्यांनी वडीलांच्या पदाचा गैरवापर करीत कधीही गर्व केला नाही. त्यांचे मोठे बंधू आशीष यांना राजकारणात रस होता. ते त्यावेळी गाणी देखील म्हणायचे. फडणवीस यांच्या वर्गमित्रांचे मागे संमेलन झाले तेव्हा फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता या दोघांनी गाणी म्हटली आणि खूप एन्जॉय केले. ते कधीच मस्ती करायचे नाहीत. त्यांच्या मित्रांना शाळेत अनेकदा कोंबडा बनविले होते. परंतू फडणवीस यांना कधी अशा प्रकारची शिक्षा झालेली नसल्याचे त्यांचे मित्र सांगतात. सामुहीकपणे खोडसाळपणा केल्याने मात्र त्यांना शिक्षा झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.